शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

देशज चिकित्सा पद्धतीला चालना देण्याची गरज : कुलगुरु प्रो. शुक्ल

By अभिनय खोपडे | Updated: July 16, 2023 18:02 IST

विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

वर्धा : पारंपरिक पद्धतीने बीमारीचा इलाज करणारे चिकित्सक लोक स्वास्थ्य चिकित्सक आहेत.  ‌आजच्या चिकित्सा प्रणालीत आधुनिक वैदूगण नंदादीपासारखे आहेत. मानवी स्वास्थ्य प्रणाली सुदृढ ठेवण्यासाठी पारंपरिक चिकित्सेला चालना देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले.

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी‍ विश्‍वविद्यालयात विश्वविद्यालयाचा मानवविज्ञान विभाग व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  15 व 16 रोजी आयोजित ‘विदर्भ परिक्षेत्रातील देशज चिकित्सक : विद्या प्रदर्शनी व सम्मेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

श्यामाप्रसाद मुखर्जी भवनात कार्यक्रमाचा समारोप रविवारी झाला. यावेळी ‘आम्‍ही आमच्‍या आरोग्‍यासाठी’ संस्‍थेचे संस्‍थापक डॉ. सतीश गोगुलवार, आय.आय.एम., नागपूचे निदेशक प्रो. भीमराया मैत्री, वनवासी कल्याण आश्रम, नागपूरचे अखिल भारतीय युवा कार्य प्रमुख वैभव सुरंगी यांनी विचार मांडले. प्र कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट व मानविकी तथा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अनिल कुमार राय हेही मंचावर उपस्थित होते.  या प्रसंगी कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी विदर्भातील वैदुंचा सन्मान सूतमाला, अंगवस्त्र, सन्मान पत्र व प्रतीक चिह्न देऊन केला. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलन व कुलगीताने करण्यात आला.

मुख्य अतिथी प्रो. भीमराया मैत्री म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे  संपूर्ण विश्व भारताकडे बघत आहे. समृद्ध देशज चिकित्सा पद्धतीच्या प्रभावाने ज्ञानार्जनाकरिता आम्ही आता शहराकडून खेड्यांकडे जात आहोत. भारतात देशज चिकित्सा व्यापक झाली असून तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 

विशिष्ट अतिथी वैभव सुरंगी म्हणाले की ज्ञानाच्या प्राचीन परंपरेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. शैक्षणिक संस्थांनी सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करुन संशोधन करावे असे आवाहन त्यांनी केले. मुख्य वक्ता डॉ. सतीश गोगुलवार यांनी आचार्य विनोबा भावे यांचे पुस्तक आरोग्य विचार व तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता यांचा उल्लेख केला. 

40 वर्षांपासून जनजाती समुदायासोबतचे अनुभव सांगतांना ते म्हणाले की परंपरागतरितीने उपचार करणारे वैद्य हळू-हळू कमी होत आहेत. नवी पीढी हे काम करतांना दिसत नाही. या उपचार पद्धतीचे अध्ययन व दस्तावेजीकरण आवश्यक झाले आहे व हे काम विद्यापीठांनी हाती घेतले पाहिजे. देशज चिकित्सा प्रदर्शनात 40 हून अधिक वैद्यांनी  वनस्पति, जड़ी - बुटी व वस्तुंचे स्टाॅल लावले होते. कार्यक्रमात स्वागत भाषण प्रो. अनिल कुमार राय यांनी केले. प्रास्ताविक मानवविज्ञान विभागाचे प्रो. फरहद मलिक यांनी केले. संचालन डॉ.अर्चना भालकर यांनी केले तर डॉ. निशीथ राय यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कुलगुरु प्रो. शुक्ल व आमंत्रित पाहुण्यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले. यावेळी अध्यापक, शोधार्थी, विद्यार्थी, गणमान्य नागरिक सेवाग्रामचे डाॅ. ओ. पी. गुप्ता, डॉ. अनुपमा गुप्ता, विधि सेवा प्राधिकरणचे विवेक देशमुख, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, आधारवड संस्थेचे शेख हाशम, बहार नेचर फाउंडेशनचे प्राध्यापक किशोर वानखेड़े, जयंत सबाने, वन्य जीव प्रतिपालक संजय इंगळे तिगावकर, डॉ. मेहरे, डॉ. प्रशांत खातदेव उपस्थित होते.