शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज

By admin | Updated: March 31, 2017 02:01 IST

निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे,

पोपटराव पवार : पाणी फाऊंडेशनकडून जनजागृतीपर कार्यक्रमआर्वी : निसर्गाची महत्त्वाची देण पाणी असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज आहे. यासाठी गावकऱ्यांनी सामूहिकरित्या श्रमदानातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव कार्यक्रमाचे संचालक पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.प्रसिद्ध सिनेनट अमीर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘सत्यमेव जयते वाटर कप’च्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने गुरूवारी येथील सहकार मंगल कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा तर अतिथी म्हणून तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार आदी उपस्थित होते. पवार पूढे म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. मानवालाच नव्हे तर प्राण्यांनाही दिलेली ही अमूल्य देण आहे. याचे योग्य पद्धतीने नियोजन होणे गरजेचे आहे. एकेकाळी पाण्याने समृद्ध झालेली गावेच्या गावे योग्य नियोजन न झाल्याने पाण्याच्या अभावाने उजाड झालेली दिसून येतात. भविष्यात पाणी ही मूळ समस्या ठरल्यास नवल राहणार नाही. याचे भान ठेवून सिनेमा, नाटक एवढेच नव्हे तर तमाशाच्या कलावंतांनी पाणी समस्येमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीवर भाष्य करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न अमिर खान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सत्यमेव जयते वाटर कपच्या माध्यमातून पाणी फांउडेशनच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी सुमीत वानखेडे यांच्या आग्रहावरून नागपूर विभागातून केवळ आर्वी तालुक्याची निवड झाली आहे. आपले गाव समृद्ध व आदर्श बनविण्याकरिता पाणी फांउडेशनच्या कार्यकर्त्यांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, पं.स. सभापती शिला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, हृदय रोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे, डॉ. रिप्पल राणे, डॉ. सचिन पावडे, प्रा. रवींद्र सोनटक्के, प्रशांत नेपटे, शंकर राठोड तथा ५२ गावातील सरपंच व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संचालन मंदार देशपांडे यांनी केले तर आभार तहसीलदार पवार यांनी मानले. कार्यक्रमाला कुणाल परदेशी, रितेश लुणावत, कडू व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)