शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता वाढविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:49 IST

तंत्रज्ञानाने उच्च पातळी गाठली आहे. तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात गुणवत्ता वाढली पाहिजे.

ठळक मुद्देमाधव कुमथेकर : विज्ञान व तंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंत्रज्ञानाने उच्च पातळी गाठली आहे. तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात गुणवत्ता वाढली पाहिजे. सोबतच संशोधनाकडे कल वाढावा. अभियांत्रिकीतील शिक्षणाचा दर्जा हिच विद्यार्थ्यांच्या संशोधनातील ऊर्जा असते, असे परखड मत नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमथेकर यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, समन्वयक डॉ. डि.आर. दांडेकर, डॉ. पी. एल. नागतोडे, डॉ. एस.डब्लु मोहोड, प्रा. एम.एन. ठाकरे उपस्थित होते. डॉ. कुमथेकर यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आयोजित ही परिषद अभियांत्रिकीमध्ये नवे बदल घडून आणेल असा आशावाद व्यक्त करीत काळानुरुप सर्व अभियांत्रिकी क्षेत्रात दर्जा वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. अभियांत्रिकीत संशोधन क्षेत्राला मोठा वाव असून विद्यार्थ्यांना संशोधनाच्या प्रवाहात आणण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. यानंतर बोलताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी बदलत्या काळात संशोधनाचे महत्त्व व त्याप्रमाणे बदल करण्याकडे लक्ष वेधले हे मुलभूत संशोधन करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. तर डॉ. दांडेकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेवर प्रकाश टाकला.देशभरातील विविध संस्थेतील १३५ शोधनिबंधाची निवड झाली. डॉ. मोहोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारोपीय कार्यक्रमाला आय.आय.टी. रुरकीचे डॉ. विश्वास सावंत, संस्था संचालक समीर देशमुख, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. एस.ए. धांदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. खोंडे व प्रा. पाहुणे यांनी केले तर आभार प्रा. ठाकरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.