शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला शासकीय योजनांची नव्हे तर परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : कान्हापूर येथील शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असून शेतीला शासकीय योजनाची नव्हे तर परिर्वनाची गरज आहे, असे प्रतिपादन शैलेश अग्रवाल यांनी केले. ते कान्हापूर येथे आयोजित शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करताना बोलत होते.नजीकच्या कान्हापूर येथे शिवसेना वर्धा विधानसभा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्त्वात शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे किशोर बोकडे, किशोर कारंजेकर, रवी चौव्हाण, विशाल व्यास, प्रवीण साठवणे, संदीप हिवरे, राहुल पाटणकर, किरण गोमासे, नवनीत साखरकर, अमोल थुल, वीरेंद्र भट, गणेश पाटील, येळणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.अग्रवाल पुढे म्हणाले, शेतकरी हितार्थ असलेल्या अनेक शासकीय योजनांची माहिती अधिकारी शेतकºयांपर्यंत प्रभावी पणे पोहोचवित नाहीत. त्यामुळे समाजातील शिक्षित वर्गाने हे काम प्राधान्यक्रमाणे केले पाहिजे. विकासाच्या दृष्टीकोणातून वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत शेतीयोग्य जमीनही अधिग्रहित केल्या जात आहे. त्यामुळे शेतीसाठी पहिलेसारखी पुरेशी जमीन नाही. रसायनिक खत, किटकनाशके आदींमुळे जमिनीची पोत घसरत आहे.शिवाय विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड ही निसर्गाच्या लहरीपणाला कारणीभुत ठरत आहे. होत असलेल्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि पर्यायी रोजगार उपलब्ध नसल्याने शेत जमिनीचे छोटे-छोटे तुकडे पडत आहेत. ही तुकड्याची शेती न परवडणारीच आहे. यामुळे छुपी बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे गरजेचे असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.प्रत्येक वर्षी शेतमालाला योग्य भाव देणे गरजेचेशेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हिच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवून प्रगती करता आली असती. सरकारने शेतमाल विक्री पद्धतीत अनेक बदल घडवून आणले असले तरी अजुनही उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव दिल्या जात नसल्याचे वास्तव आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचा विचार करता प्रत्येक वर्षी शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे, असे अग्रवाल यांनी सांगितले.