शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज

By admin | Updated: May 15, 2014 01:44 IST

शासकीय बांधकाम तंत्रज्ञानाकरिता विविध राज्यातील संशोधित केलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन हुडकोचे माजी प्रमुख व्ही. सुरेश यांनी केले.

कार्यशाळा : व्ही. सुरेश यांचे विचारवर्धा : शासकीय बांधकाम तंत्रज्ञानाकरिता विविध राज्यातील संशोधित केलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन हुडकोचे माजी प्रमुख व्ही. सुरेश यांनी केले.दत्तपूर येथील ग्रामोपयोगी विज्ञात केंद्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा) अंतर्गत इतरत्र बांधकामासाठी किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक ग्रामीण विकास विभागाचे जी. एन. शर्मा, राज्याच्या उपसचिव आर. विमला, नागपूरचे मुत्थुकृष्णन शंकरनारायण, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या उर्मिला राजाध्यक्ष, पश्‍चिम बंगालचे कार्यकारी अभियंता दीपनकर चक्रवर्ती, सुमित मुजुमदार, रूपम दीभारामा, आंध्रचे के. धनराज, नाईक, मालपानी आदींची उपस्थिती होती.कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुरेश म्हणाले, शासकीय योजनांच्या बांधकामात अंतभरूत असलेले अंगणवाडी, पंचायत भवन, शाळा, धान्य गोदाम आदी इमारतीच्या बांधकामाकरिता उपलब्ध काँक्रीट तंत्रज्ञानापेक्षा संशोधित तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. पर्यायी तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक कुशल, अकुशल कारागीर, उपलब्ध बांधकाम साहित्य यांचा उपयोग करून मनरेगा योजना यशस्वीपणे राबविण्यात येऊ शकते. मनरेगांतर्गंत पारंपरिक बांधकामाला पर्याय म्हणून नवीन पद्धत अवलंबता येते, असे पॉवरपॉइंटच्या साहाय्याने त्यांनी पटवून दिले.कोलकाताचे रबी मुखोपाध्याय यांनी पूवरेत्तर राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध बांबूचा उपयोग बांधकामासाठी कुशलतेने केला जात ंअसल्याचे सांगितले. त्याचबरोबर बांबू तंत्रज्ञान वापराबाबत अमृत देशपांडे, वैभव काळे, सुनील देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले.राज्याध्यक्ष यांनीही संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत पर्यायी बांधकाम तंत्रज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रामार्फत कार्यकारी संचालक डॉ. सोहम पंड्या, अभियंता आशिष तळवेकर यांनी मातीच्या भिंती, कोनिकल टाइल्सचे छत याबाबत प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. केरळमधील साजन यांनी उंदरासाठी पिंजरा, छताचा भराव या राज्यातील प्रचलित तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.कार्यशाळेचे समन्वयक जी. एन. शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेकरिता आयुक्त कार्यालयातील सहआयुक्त भगत, मिनियार, संचालक खोडके, वर्धा येथील मनरेगाचे उपजिल्हाधिकारी सुनील रहाणे, धर्माधिकारी, बोरकर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक सुधीर पारगावकर, उपसंचालक राजेंद्र साहू, पंकज लव्हाळे आदींनी सहकार्य ंकेले.(शहर प्रतिनिधी)