शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुरावलेल्या २११ दाम्पत्यांना आणले जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा ...

ठळक मुद्देमहिला तक्रार निवारण कक्षाची कामगिरी : ५७३ पैकी ५३२ प्रकरणांचा केला निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारातून महिलावरील अन्याय-अत्याचार वाढत असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाकडे अकरा महिन्यात ५७३ तक्रारी आल्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यापैकी ५३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून तब्बल २११ दुरावलेल्या दाम्पत्यांना जवळ आणत त्यांचा विस्कटलेला संसार जुळविण्यात यश आले आहे.जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे जानेवारी २०१७ ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कौटुंबिकहिंसाचाराच्या एकूण ५७३ तक्रारी प्राप्त झाल्या. विविध कारणांनी पत्नीचा छळ करणे तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देणे शिवाय हुंड्यांसाठी सासरच्या मंडळीकडून छळ करणे आदी कारणे या आशयाच्या तक्रारी या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी महिला तक्रार निवारण समितीने ५३४ तक्रारींचा निपटारा केला. त्यापैकी २११ प्रकरणी पती-पत्नी यांच्यात आपसी समझोता करून त्याचे संसार जोडले आहे. इतकेच नव्हे तर २६७ प्रकरणे दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रकरणे निवारण समितीत निपटारा न झाल्याने न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. तर ५१ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ अंतभूत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच तक्रारी दाखल करून तक्रारकर्ते अथवा दोन्ही पक्षाकडील कुणीच उपस्थित न राहिल्याने व अन्य कारणांमुळे सदर महिला समितीकडे १०८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा महिला तक्रार समितीकडे येणारी प्रत्येक तक्रार जमेपर्यंत आपसी समझोत्याने निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, सुरेखा खापर्डे, अणु राऊत, सविता मुुंडे, अंजू वाघ, व्ही.ना. क्षीरसागर आदी करीत आहेत.७ प्रकरणी गुन्हे दाखलदुरावलेल्या २११ दाम्पत्यांना एकत्र आणण्यात सदर केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना यश आले असले तरी १०८ प्रकरणे अद्यापही विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. सात प्रकरणी चौकशीत तत्थ आढळल्याने अखेर भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.