शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस-बसपा युतीवर विचारमंथन

By admin | Updated: January 28, 2017 01:11 IST

काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद

चर्चा सकारात्मक : निर्णयाचा चेंडू बसपाश्रेष्ठींच्या कोर्टात राजेश भोजेकर ल्ल वर्धा काँग्रेससोबतची आघाडीची शक्यता मावळत असताना बहुजन समाज पार्टीसोबत हात मिळवणी करुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बोलणीला यश येत नसल्यामुळे नवा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बसपासोबत युतीबाबत बोलणी सुरू केलेली आहे. बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या युतीबाबत उत्साही आहे. मात्र बसपाने कुणाशीही युती न करता स्वबळावरच लढावे, असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असल्यामुळे ही युती होईल किंवा नाही याबाबत साशंकताच आहे. युती केल्यास काही जागांवर बसपाला हमखास यश मिळण्याची शक्यता आहे. हा पक्ष प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आला आहे. मात्र काही मतांनी पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागत आहे. ही बाब हेरुन स्थानिक पातळीवर युती करण्यास वरिष्ठांनी हिरवी झेंडी दिल्यास पक्षाला सत्तेत सहभागी होता येणे कठीण नाही. या पद्धतीने बसपाचे स्थानिक पदाधिकारी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरुन अद्याप होकार आला नसल्याची माहिती आहे. बसपाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी अनेकदा अन्य पक्षांशी हातमिळवणी केली आहे. मग इतर राज्यातील कार्यकर्त्यांनाही आपण सत्तेत सहभागी होण्यासाठी युती करायला काय हरकत, असा प्रश्न पडला आहे. बसपाकडे कॅडर आहे. मात्र विजयाचा आकडा गाठता येणे जड जात आहे. विजयश्री खेचून आणायची असेल, तर युतीशिवाय पर्याय नाही, असा सूरही बसपा कार्यकर्त्यांत उमटत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. एक पाऊल बसपालाही टाकायचे आहे. यासाठी परवानगीचा चेंडू बसपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे. याकडे बसपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. बसपाने स्थानिक पातळीवर युती करुन निवडणुका लढल्यास पक्षाला हमखास यश मिळेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीबाबतचा प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळाल्यास युतीबाबतचा निर्णय होईल. - मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, बसपा, वर्धा.