शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचे घोडे वर्धेच्या करुणाश्रमात, बालेकिल्ला अबुजमाडातून केले होते जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 18:08 IST

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्याच्या सीमेवरील अबुजमाडात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान जप्त करण्यात आलेले खच्चर प्रजातीचे सहा घोडे सध्या वर्धेच्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात आणण्यात आले आहे.

वर्धा, दि. 10 - नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्याच्या सीमेवरील अबुजमाडात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान जप्त करण्यात आलेले खच्चर प्रजातीचे सहा घोडे सध्या वर्धेच्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात आणण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून येथे आणण्यात आले आहे. या घोड्यांचा नक्षलवादी दळणवळणासाठी वापर करीत होते.

गत महिन्यात गडचिरोली पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सीमावर्तीय भाग असलेल्या अबुजमाड येथे चांगलीच चकमक झाली होती. त्यावेळी पोलिसांची शक्ती पाहून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षलवाद्यांचे तीन नर व तीन मादी असे खच्चर प्रजातींची एकूण सहा घोडेही जप्त केले होते. हे घोडे चार ते पाच वर्षं वयोगटातील असून जंगलात व खडकाळ ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण देण्यात आले आहे. अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांचा संपूर्ण दारूगोळा व त्यांच्या मुख्य कमांडरला इतर ठिकाणी नेण्याचे काम हे घोडे करीत होते.गडचिरोली पोलिसांच्या हाती प्रथमच उत्तम प्रशिक्षण देण्यात आलेले हेच ते नक्षलवाद्यांचे घोडे असल्याचे सांगण्यात येते. जप्त करण्यात आलेल्या या घोड्यांना विदर्भात कुठेही ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून या सहा घोड्यांना सध्या वर्धेतील पिपरी (मेघे) भागातील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात शनिवारी रात्री या घोड्यांना करुणाश्रमात आणण्यात आल्याचेही सांगण्यात येते. या घोड्यांची निगा सध्या पीपल फॉर एनिमल्सची संपूर्ण टीम घेत आहे.