शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

नळाच्या पाण्यात नारू

By admin | Updated: March 31, 2016 02:44 IST

गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही.

आरोग्य धोक्यात : सेलसुरा पाणी पुरवठा योजनेतील प्रकार वायगाव (नि.) : गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली; पण कारवाई झाली नाही. आता नळाच्या पाण्यात नारूसदृश कृमी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सेलसुरा या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेच्या विहीर व टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. ग्रा.पं. चा शिपाई दिरंगाई करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय पाईप-लाईनही अनेक ठिकाणी फुटलेली आहे. यामुळे नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण कुणीही याकडे लक्ष दिले नाही. यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. एक वर्षापासून मुख्य पाईप लाईन फुटलेली असताना दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. लेखी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने सार्वजनिक आरोग्याचे कुणालाही सोयरसुतक नाही काय, असा प्रश्न सेलसुरा येथील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.(वार्ताहर)फुटलेल्या पाईपकडेही दुर्लक्षसेलसुरा येथील ग्रामस्थांना गत कित्येक दिवसांपासून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. आता नळातून नारूसदृश्य कृमी येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गत एक वर्षापासून गावातील पाईपलाईन लिकेज आहे. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या; पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.ग्रामपंचायतचा शिपाईदेखील पाणी पुरवठ्याची विहीर आणि टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकत नाही. गत सहा महिन्यांपासून पाणी शुद्ध करण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.