शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

२६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देथंडी, धुके अन् दवाने वाढविली चिंता । गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील आठ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह धुक्याचे सावट आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस पारा खाली सरकत आहे. यामुळे तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अशातच तूर पिकावर गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत असून पीकही वाकल्यागत दिसून येत आहे. एकूणच तालुक्यातील २६० हेक्टरवरील तूर पिकांवर सध्या निसर्गाची वक्रदृष्टीच असल्याचे शेतकरी सांगतात.धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. रोख पीक म्हणून तूर पिकाकडे बघितले जाते. परंतु, डिसेंबर महिन्यात याच पिकावर किडींनी अटॅक केला. तर आता निसर्गाची वक्रदृष्टीच या पिकावर पडली आहे. परतीच्या पावसामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला. अशातच खरिपातील सोयाबीनचे उत्पन्नही समाधानकारक राहिले नाही. परतीच्या पावसाचा फटकाच सोयाबीन पिकाला बसला. कपाशी पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनातही घट येत आहे. शिवाय कपाशीने दगा दिल्याने तूर पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु, मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील वाठोडा, वागदा, अहिरवाडा, इठलापूर, नांदपूर, सर्कसपूर, निंबोली (शेंडे), लाडेगाव, टाकरखेडा, जळगाव, वर्धमनेर, देऊरवाडा, टोणा, एकलारा, मांडला, सावलापूर, हरदेली, गुमगाव, दहेगाव, पाचेगाव, पिंपळखुटा, खुबगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, चिंचोली, पाचोड यासह तालुक्यातील २६ गावामधील २६० तूर पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’चिकणी (जामणी) : मागील काही दिवसांपासून परिसरात ढगाळी वातावरण आहे. या ढगाळी वातावरणामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तूर उत्पादकांना पिकावर फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वास्तविक पाहला २०१९ हे वर्ष शेतकऱ्यांच्या अडचणीत वेळोवेळी भर टाकणारेच ठरले आहे. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. कसे बसे कपाशी पीक बहरले असता त्यावर गुलाबी बोंडअळीने अटॅक केला. तर आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर थंडीतही वाढ झाली असून पहाटेच्या सुमारास दव पडत असल्याने चणा व गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकूणच यंदाच्या वर्षी शेतमालाला मिळत असलेल्या भावाच्या तुलनेत परिसरातील शेतकºयांना उत्पादन खर्च जादाच लागल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. शेतातील तणाची विल्हेवाट लावताना परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला. अशातच काही शेतकऱ्यांना कपाशी पिकाला मुकावे लागले. तर परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे कंबर्डे मोडले. सध्या तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, अळीचा प्रादुर्भाव या पिकावर असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करावी लागतेय तारेवरची कसरतचिकणी (जामणी) परिसरात रोही, रान डुक्कर आदी वन्यप्राण्यांचे मोठाले कळप आहेत. त्यांच्याकडून कापूस, तूर, चणा, गहू आदी पिकांची नासाडी केली जात आहे. शेतातील उभ्या पिकाच्या संगोपनासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी आहे.