शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

अस्थिविसर्जनातून निसर्ग संगोपनाचा संदेश

By admin | Updated: May 20, 2016 01:53 IST

अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते.

चिलवीरवार कुटुंबियांनी ठेवला आदर्श : अस्थी, रक्षा स्मशानभूमीत पुरून त्यावर वृक्षारोपणहिंगणघाट : अंत्यसंस्कारानंतर चितेची राख तसेच अस्थी नदीत विसर्जन केल्याने नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्याकरिता स्मशानभूमीतच खड्डा करून त्यात अस्थी, चितेची राख पुरून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावत येथील तहसील वॉर्डातील लेबर कॉलनीत चिलवीरवार कुटुंबियांनी निसर्ग संगोपणाचा नवीन पायंडा घालून दिला आहे.अस्थी, चितेची राख, पूजाविधीत काढलेले डोक्यांवरील केस नदीत विसर्जन करण्याची परंपरा आहे; पण यातून नदीपात्राचे प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्याचा निर्णय चिलवीरवार कुटुंबियांनी घेतला. यातून समाजापुढे पर्यावरण रक्षणाचा एक आगळा आदर्श ठेवला गेला.खड्ड्यात ही राख, अस्थी ठेवून त्यावर वटवृक्षाचे रोपटे लावले. या वटवृक्षाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा कठडाही चिलवीरवार कुटुंबियांनी बसविला. या झाडातून आपल्या वडिलांची आठवण जपण्याचा संकल्पही त्यांनी येथे सोडला. येथील श्याम बळीराम चिलवीरवार यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वणा नदीच्या तिरावरील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आला; पण यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेहावरील निर्माल्य, कापलेले केस नदीत विसर्जित न करता स्मशानभूमीवर खड्डा करून त्यात टाकले. यानंतर अस्थी, चितेच्या राखेचे विसर्जन कुठल्याही नदीत वा तलावात न करता स्मशानभूमित एका खड्ड्यात पुरून त्यावर वडाचे रोप लावण्यात आले. यावेळी श्यामराव चिलवीरवार यांची मुले विष्णु चिलवीरवार, अनिल चिलवीरवार, उषा परकोटवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज गोल्हर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावता यावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असे विचार चिलवीरवार कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)