शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने हिरावला बोर अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 19:38 IST

Wardha News यंदा संबंधित संरक्षित वनात ५५ मचाणांवर रात्र जागत वन्यजीवांचे दर्शन घेण्याची इच्छा उराशी बाळगून तब्बल १०९ व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने बुकींग केली होती.

महेश सायखेडे

वर्धा : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वन्यजीवांबाबत प्रेम असलेल्या अनेक व्यक्ती मोठ्या आशेने वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभवासाठी नोंदणी करतात. यंदा संबंधित संरक्षित वनात ५५ मचानींवर रात्र जागत वन्यजीवांचे दर्शन घेण्याची इच्छा उराशी बाळगून तब्बल १०९ व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने बुकींगही केली. पण थांबून थांबून सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसाने या व्यक्तींचा निसर्गानुभवाचा आनंदच हिरावला आहे.

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य नागपूर कार्यालयाच्या वतीने ५ व ६ मे रोजीला निसर्गानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा लाभ घेत निसर्गानुभवाचा आनंद लुटण्याची इच्छा असणाऱ्यांना घरबसल्या नोंदणी करता यावी यासाठी ऑनलाईन बुकींगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. संबंधित राखीव जंगल क्षेत्रातील एकूण ५५ मचानींवर रात्र जागून विविध वन्यजीवांचे दर्शन होईल या आशेने ऑनलाईन पद्धतीचा वापर करून तब्बल १०९ व्यक्तींनी बुकींगही केली. पण मागील काही दिवसांपासून कोसळणारा सततचा पाऊस व ढगाळी वातावरणाचे कारण पुढे करून बुधवारी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य नागपूर पी. बी. पंचभाई यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निसर्गानुभव कार्यक्रम रद्द झाल्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे अवकाळीने बोर अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील निसर्गानुभवच यंदा हिरावल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.कुठे किती होत्या मचाणी?बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून चंद्र प्रकाशात नागरिकांनाही निसर्गानुभवाचा आनंद लुटता यावा या हेतूने सेलू तालुक्यातील न्यू बोर येथे दहा मचानी, बोर येथे १५ मचानी, उमरेड येथे १०, पवनी येथे १० तर कुही येथे १० मचानी उभारण्यात आल्या होत्या. या एकूण ५५ मचानींवर अनुक्रमे २०, ३०, २०, २०, २० व्यक्तींना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, हे विशेष.

टॅग्स :Tigerवाघ