शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

नांदपूरच्या दिव्याचा ‘स्मार्ट व्हीलेज’ आयडिया एक्सचेंजमध्ये

By admin | Updated: January 14, 2016 02:52 IST

नांदपूर येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या थूल हिने मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांच्यासह केरळ मधील एर्नाकुलम....

केरळमध्ये मारली बाजी : प्रकल्प ग्रामीण भागात कार्यान्वित करण्यासाठी घेतली विशेष माहिती आर्वी : नांदपूर येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या थूल हिने मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांच्यासह केरळ मधील एर्नाकुलम येथे ४२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात स्मार्ट व्हिलेज हा प्रकल्प सादर केला. सदर प्रदर्शन एनसीईआरटी दिल्ली यांच्या मार्फत भरविले जाते. दिव्याने सादर केलेल्या स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पाची विशेष दखल या राष्ट्रीय प्रदर्शनात घेण्यात आली. यांनतर आयडीया एक्सचेंज येथे हा प्रकल्प सादर करण्यात आला. केरळ येथील प्रदर्शनामध्ये भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश यामधून एकूण २११ प्रकल्प सादर करण्यात आले. एनसीईआरटीने यापैकी केवळ १९ प्रकल्पाची विशेष दखल घेत त्याचे विशेष पुस्तक प्रदर्शनामध्ये प्रसिद्ध केले. यात दिव्याचा स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचा समावेश आहे.शिवाय आयडीया एक्सचेंज या विशेष सादरीकरणासाठी भारतातील पहिल्या चार प्रकल्पामध्ये तिचा प्रकल्प निवडण्यात आला. यात गोवा, बडोदा (गुजरात), बंगलोर (कर्नाटक) व नांदपूर (महाराष्ट्र) या प्रकल्पांचा समावेश होता. दिव्याने आयडिया एक्सचेंजच्या विशेष कार्यक्रमात पी.पी.टी.द्वारे सर्व भारतीयांसमोर स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातून आलेल्या दिव्याच्या सुत्रबद्ध आणि आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणाला सर्व उपस्थित भारतीयांनी विशेष दाद दिली. एनसीईआरटीचे निदेशक डॉ. वझलवार, डॉ. रचना गर्ग यांनी विशेष प्रभावित होऊन दिव्याचे कौतुक केले.दिव्याचा प्रकल्प ग्रामीण विकासासंबंधी असल्यामुळे प्रसिद्ध भारतीय अवकाश संशोधक, इसरोचे माजी अध्यक्ष व इंडियन इंन्स्टिट्युट आॅफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष पद्मविभूषण के. राधाकृष्णन यांनी दिव्याच्या प्रकल्पाची विशेष विचारपूस केली. केरळच्या डॉ. जया यांनीही सदर प्रकल्प ग्रामीण भागात कसा राबविता येईल याबाबत माहिती जाणून घेतली. यशाबद्दल दिव्या व तिचे मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र चौधरी यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. दिव्यांच्या प्रकल्पाला शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना निमकर यांनीही मोलाचे सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)