शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव ग्रा.पं.त भोंगळ कारभार

By admin | Updated: January 5, 2017 00:43 IST

नजीकच्या नांदगाव (कानगाव) ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठल्याचा आरोप होत असून कारवाईबाबत संबंधिताना निवेदने देण्यात आली.

सीईओंचे तक्रारींकडे दुर्लक्ष : ग्रामसभा घेतल्याचा बनाव करीत असल्याचा आरोप वायगाव(नि.) : नजीकच्या नांदगाव (कानगाव) ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठल्याचा आरोप होत असून कारवाईबाबत संबंधिताना निवेदने देण्यात आली. परंतु, त्याकडे संबंधीतही दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव (का.) ग्रा.पं.मधील गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. नांदगाव (का.) ग्रा.पं.त जून २०१६ पासून अद्याप मासिक सभा घेण्यात आली नाही. ग्रा.पं. सचिव व सरपंच आपल्या मनमर्जीप्रमाणे कामे करीत असून अनेक ठिकाणी विनाकारण खर्च करीत आहेत. त्याचा हिशोब उपसरपंच व सदस्यांना दाखवण्यात आला नसल्याचा आरोप उपसरपंच शंकर वाघमारे व सदस्य सतीश ठाकरे आदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. सरपंच व सचिव यांनी अद्याप ग्रामसभाही घेतली नाही. वॉर्ड १ मधील अतिक्रमण काढण्याचे आदेश वरिष्ठांनी परिपत्रकाद्वारे दिले. मात्र, सचिव म्हैसकर यांनी सरपंचासोबतचे संबंध जोपासत अतिक्रमण काढण्यासाठी अद्याप कुठलेही कार्यवाही केली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना २० सप्टेंबर २०१५, ३० आॅक्टोबर २०१५, ३० जून २०१६, १ आॅगस्ट २०१६, २८ आॅगस्ट २०१६, ८ सप्टेंबर २०१६, १६ आॅक्टोबर २०१६, ५ डिसेंबर २०१६ आदी वेळा तक्रारी करीत चौकशीची मागणी केली. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आदींना निवेदन देऊन माहिती देण्यात आली. परंतु, अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. नांदगाव (का.) ग्रा.पं. मध्ये मासिक सभा जून महिन्यापासून घेण्यात आली नाही. सरपंच व सचिव सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करीत आहेत. ते विविध कामांचा विकास निधी आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. सदर प्रकारामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत चौकशी होणे क्रमप्राप्त असून तात्काळ संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच महिन्यांपासून ग्रामसभा घेण्यात आली नाही. परंतु, अनेक नोटीस ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर चिकटविण्यात आले आहे. सदर नोटीसच्या माध्यमातून ग्रामसभा झाल्याचे दर्शविण्यात येत असून सदर प्रकार ग्रामपंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची दिशाभूल करणारा असल्याने सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)