शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’च्या नावाखाली शासनाला लाखोंचा चुना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:48 IST

स्थानिक नगरपंचायत स्वच्छ शहराच्या दिशेने पाऊल टाकत असली तरी येथील काही कामांचा दिलेला कंत्राट सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने कंत्राटदाराचे भल तर केल्या जात नाही ना असा सवाल शहरातील स्वच्छता प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअफलातून कारभार :वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्थानिक नगरपंचायत स्वच्छ शहराच्या दिशेने पाऊल टाकत असली तरी येथील काही कामांचा दिलेला कंत्राट सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने कंत्राटदाराचे भल तर केल्या जात नाही ना असा सवाल शहरातील स्वच्छता प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायत काही विषय एखादी कर्मचारी नियुक्त करून करू शकत असताना कंत्राटदाराला लाभ मिळेल अस करीत त्यावर मोठा निधी खर्ची केला जात आल्याने या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही गरज निर्माण झाली आहे.शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण करून सचखंड फसिलीटी सेंटर, नांदेड यांना कंत्राट देण्यात आला. शिवाय वार्षिक ५६ लाख ६४ हजार ४०० रूपये देण्याचा करार झाला. सदर कंत्राटदाराला नगरपंचायत प्रशासनाला प्रती महिना ४.७२ लाख द्यावे लागतात. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराने ३ मालवाहू उपलब्ध करून देत त्यावर चालकांची नियुक्ती केली. त्यांचे वेतन धरून १२ हजार रूपयांचा हा खर्च आहे. सर्व गोष्टींचा हिशेब केला असता कंत्राटदाला महिन्याचा १.६२ लाखांचा खर्च येतो. परंतु, नगरपंचायत प्रशासनाला कंत्राटदाराला दर महिन्याला ४ लाख ७२ हजार रूपये अदा करावे लागत आहे. या रक्कमेची तफावत लक्षात घेता दर महिन्याला ३ लाख १० हजारांचा नफा कंत्राटदाराला होत आहे. त्यामुळे सुजान नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.शहरात १७ वॉर्डशहरात एकूण १७ वॉर्ड आहे. या वॉर्डात एका मजुराची नियुक्ती करून त्याच्याकडून साफसफाई करून नगरपंचायतच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास हे काम केवळ २ लाखामध्ये पूर्ण केले जाऊ शकते, असे जानकार सांगतात. परंतु, सध्या नगरपंचायत प्रशासन कुणाचे हित जोपासत आहे हेच कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे कार्यवाहीची मागणी आहे.स्वच्छता अभियानच्या नावावर हा लाखो रूपयाचा कंत्राटदाराला फायदा मिळवून दिल्या जात आहे. हा प्रकार नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. २ लाखात प्रत्येक महिन्यात शहरातील १७ वॉर्ड स्वच्छ होऊ शकतात. परंतु, महिन्याला कंत्राटदाराला ४ लाख ७२ हजार रूपये दिले जात आहे. हे उलघडणारे कोडे आहे. यावर सर्व सदस्यांनी विचार करून शासकीय निधीची होणारी उधडपट्टी थांबवावी.- मधुकर कामडी, विरोधी पक्ष नेता, नगरपंचायत, समुद्रपूर.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार