शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडने केली १४ हजार ७०० क्विंटल तुरीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:19 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पाडण्याचा प्रकार नित्यनियमाप्रमाणे यंदाही बाजार समित्यांमध्ये घडला.

ठळक मुद्दे३,९५० पैकी १,२२७ शेतकऱ्यांनी दिली तूर

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पाडण्याचा प्रकार नित्यनियमाप्रमाणे यंदाही बाजार समित्यांमध्ये घडला. यामुळे हमीभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांची तूर नाफेडला देण्याचा निर्णय घेतला. यात आतापर्यंत जिल्ह्यात सुरू असलेल्या ७ खरेदी केंद्रांमधून १४ हजार ७००.६६ क्विंटल तूर खरेदी केली आहे.तूर खरेदी संदर्भात शासनाने आॅनलाईन पद्धत अस्तित्वात आणल्याने शेतकऱ्यांनी नोंदी करून तूर खरेदीला सहकार्य केले. वर्धा जिल्ह्यात सातही केंद्रांवरून ३ हजार ९५० शेतकऱ्यांकडून नोंदी झाल्या होत्या. त्यापैकी १,२२७ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. या तूर खरेदीपोटी त्यांची ८ कोटी १ लाख १८ हजार ५९७ रुपयांचे चुकारे शासनाकडे थकल्याचे सांगण्यात आले आहे.तूर खरेदी दरम्यान नाफेडच्या केंद्रावर पहिले नमुने घेण्याच्या सूचना केंद्रावरून देण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकरी पहिले तुरीचे नमुने घेऊन केंद्रावर दाखल होत आहे. येथे शासनाने दिलेल्या निकषानुसार बसत असलेल्या तुरीची खरेदी करण्यात येत असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहे. मध्यंतरी तूर खरेदीनंतर तिची नोंद होण्यास विलंब झाल्याने बºयाच शेतकऱ्यांचे चुकारे अडले होते. आता नाफेडच्या गोदामात तूर पोहोचल्याने शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती मार्केटींग कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.एकाच दिवसात ट्रक खाली होण्याचा नियमजिल्हास्तरावर तूर खरेदी झाल्यानंतर ती नाफेडच्या मुख्य गोदामात गेल्यानंतर एकाच दिवसात ट्रक खाली होण्याचा नियम आहे. या नियमानुसार काम होणे अपेक्षित असताना तसेच होत नसल्याचे दिसून आले आहे. एक ट्रक खाली होण्याकरिता गोदामात किमान दोन दिवसांचा कालावधी जात असल्याची माहिती आहे.वर्धेचे गोदाम फुल्लकृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी तूर विक्रीकरिता नाफेडच्या केंद्रावर गर्दी करीत आहेत. यामुळे आवक वाढल्याने खरेदी झालेली तूर जमा करण्याकरिता वर्धेतील गोदाम कमी पडत आहे. बोरगाव (मेघे) व एमआयडीसीतील पणन महासंघाचे गोदाम फुल्ल झाले असून खरेदी झालेले तूर ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.