शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाचणगाव ग्रा.पं. मधील गोंधळ

By admin | Updated: June 17, 2017 00:37 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला सन २०१६-१७ मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजना सुरू आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला सन २०१६-१७ मध्ये ४३४ लाभार्थ्यांकरिता ५२ लाख ८ हजार रुपयाची राशी १६ हप्त्यात प्राप्त झाली. यातून रवींद्र गावंडे यांना दिलेला १३ हजार रुपयाचा धनादेश अनादरीत झाला. याची चौकशी सुरू असताना येथे २७ लाख ३६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या प्रकाराच्या चौकशीची मागणी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, सर्वप्रथम या योजनेचे लाभार्थी रवींद्र गावंडे यांचा १२ हजाराचा धनादेश अनादरीत झाल्याचे म्हणने आहे. सदर प्रकार नजरचुकीने झाल्याचे समितीचे म्हणने आहे. हा प्रकार झाकण्याचा प्रकार सुरू असतानाही नाचणगावातील सहा लाभार्थ्यांचे धनादेश बाऊन्स झाल्याची चर्चा होती. परंतु राजकीय दबावामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा आहे. आता तर चक्क २७ लाख ३६ हजाराचे घबाड बाहेर आले आले आहे. यामुळे या समितीच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर पठाण, उपसरपंच सुरेश देवतळे व इतर काही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारी नुसार बँक आॅफ इंडिया, नाचणगाव शाखेत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या नावे बचत खाते आहे. या खात्यातून ३ फेब्रुवारी २०१६ ते ५ मे २०१७ पर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारात काही लाभार्थ्यांची रक्कम रोख काढण्यात आली. तर काहींना लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष अनुप टेंभुर्णे यांच्या नावे ६ लाख ३५ हजार व त्यांच्या पत्नीचे नाव ४ लाख रुपये काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड होवून दोन वर्षांत केवळ तीनच सभा झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय या समितीने झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कुठलीही मंजूरी घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यापैकी काही लाभार्थ्यांच्या नावे घरच नाही तर काही लाभार्थी हयात नसल्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून शासकीय लेखा परीक्षकांकडून लेखा परीक्षण करण्यात यावे व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.