शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीच्या हत्येचे रहस्य गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 23:50 IST

पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले नाही.

ठळक मुद्देपाच जणांची चौकशी : मृताच्या शरीरावर ९० जखमा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा / पुलगाव : पुलगाव शहरातील आर्वी मार्गावरील रेल्वे वसाहतीतील रहिवासी भारती जांभुळकर (३८) हिची हत्या अज्ञात व्यक्तीने केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर २४ तासांचा कालावधी लाटूनही भारतीच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पुलगाव पोलिसांना यश आलेले नाही. आतापर्यंत पुलगाव पोलिसांनी सुमारे पाच जणांना ताब्यात घेत विचारपूस केल्याचे सांगण्यात आले.पोलीस सूत्रानुसार, भारतीला घरी एकटी असल्याचे हेरून आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून तिला धारदार शस्त्रासह जड वस्तूने मारहाण करून तिची हत्या केली. या प्रकरणी पुलगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच पुलगाव पोलिसांच्या दोन तर स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अशा एकूण चार चमू आरोपीच्या शोधार्थ रवाना झाल्या आहेत. जसजशी माहिती पोलिसांना मिळत आले तसतसे काहींना ताब्यात घेत पोलीस त्यांना विचारपूस सध्या करीत आहेत. घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या ठसे तज्ज्ञ चमू व श्वान पथकाला आरोपी हुडकुन काढण्यासाठी पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात येते.मृतक भारतीचा पती धीरज हा रेल्वे पार्सल विभागात पॉईटमेन पदावर कार्यरत आहे. तर मृतक भारती ही ब्युटी पार्लर व पिको सेंटर चालवित होती. घटनेच्या दिवशी आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्यापूर्वी मृतकाच्या घरातच टपात असलेल्या पाण्याचा वापर पुरावे नष्ट करण्यासाठी केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मारेकºयाने भारतीला मारहाण करताना कुठलीही दया दाखविली नाही. मृतक भारतीच्या शरीरावर चक्क ९० जखमा आरोपीने केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तर घटनेचा दुसरा दिवस असलेल्या रविवारी पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली.पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे करीत आहेत. लवकरच मृतक भारती जांभूळकर हिच्या मारेकऱ्याला अटक करण्यात येईल, असा ठाम विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.रेल्वे वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूपमृतक भारती जांभूळकर हिचे शवविच्छेदन रविवारी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मृतकाच्या घराच्या आवारात दंगल नियंत्रण पथकासह पोलीस शिपाई तैनात करण्यात आल्याने रेल्वे वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.मारेकºयाचा उद्देश चोरीचा नव्हेच?मृतक भारतीचा मारेकरी हूडकून काढण्यासाठी पुलगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सध्या जीवाचे रान करीत आहेत. असे असले तरी अद्यापही भारतीचा मारेकरी पोलिसांना गवसलेला नाही. मृतकाच्या हातातील अंगठीसह घरातील इतर मौल्यवान साहित्याला भारतीच्या मारेकºयाने हात लावला नाही. त्यामुळे मारेकरी हा चोरी करण्याच्या उद्देशाने तर नक्कीच भारतीच्या घरात आला नव्हता असा कयास सध्या पोलिसांकडून वर्तविला जात आहे.

टॅग्स :Murderखून