शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

मुस्लीम भगिनी मेळावा

By admin | Updated: April 29, 2016 02:06 IST

चेतना-विकास गोपुरी वर्धाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मुस्लीम भगिनी मेळावा घेण्यात आला.

कायद्यासह विवाहांबाबत मार्गदर्शनगिरड : चेतना-विकास गोपुरी वर्धाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मुस्लीम भगिनी मेळावा घेण्यात आला. संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सूमन बंग यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा घेण्यात आला. चेतना-विकास संस्थेच्या परिचय व प्रास्ताविक ज्येष्ठ कार्यकर्त्या शिला लामसे यांनी केले. अ‍ॅड. शाहीन शेख यांनी मुस्लीम कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. यात मुस्लीम महिला हक्क संरक्षण कायदा १९८६, मुस्लीम विवाह विच्छेदन अधिनियम १९३९ तसेच १२५ अंतर्गत मुस्लीम महिलेचे दुसरे लग्न होइपर्यंत पतीकडे खावटी मागण्याचा हक्क आहे, असे सांगितले. मेहेर ठरविल्याशिवाय मुसलमान लग्न कायदेशीर होऊ शकत नाही, या विषयावरही अ‍ॅड. शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले. समुपदेशक मनीषा यादलवार यांनी समाधान केंद्रात येणारी समस्याग्रस्त प्रकरणे कशी हाताळली जातात, त्याचे स्वरूप कसे असते, याबाबत माहिती दिली. हे सुरू असताना वाढत्या वयातील मुलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी पालकांनी मुलाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवाव्या व मुलांशी मैत्रीपूर्ण नाते जोपासावे, असे मार्गदर्शनही करण्यात आले.सासू व सून नातेसंबंध अतिशय नाजुक असतात. या नात्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. दोघींनीही एकमेकींना समजून घेऊन कुटूंब मजबुत करावे, असे आवाहन समुपदेशक संगीता कपारे यांनी केले. उद्योग, व्यवसायाबाबत मार्गदर्शन करताना प्रारंभी लहान-लहान व्यवसाय करून मोठे उद्योग उभे करावे. यातून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे करता येतो, असे विविध उदाहरणांसह शिला लामसे यांनी सांगितले. महिला बचत गटाच्या अध्यक्ष रिजवाना काझी यांनी असे कार्यक्रम मुस्लिम महिलांकरिता व्हावे, असे मनोगत व्यक्त केले. संचालन चेतना विकासच्या सुपरवाईझर नलिनी जामुनकर यांनी केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता कादीर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)