शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीसाठी प्रहारकडून मुरुमाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:38 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागात आंदोलन : अधिकाºयांची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणून देण्यासाठी प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्त करून द्यावे, यासाठी चक्क गिट्टी, मुरूम भरलेले टोपले निवेदनासोबत दिले. प्रहारचे जगताप यांनी अचानक सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यलयात जाऊन ही भेट दिल्याने अधिकारी, कर्मचाºयांची भंबेरी उडाली.शहराला जोडणाºया रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्वी लगतच्या २० किमी अंतरावर दररोज अनेकांना कामानिमित्त ये-जा करावी लागते. हे खड्डे रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अपघात होतात. खड्ड्यांमुळे अपघाताची संख्याही वाढली आहे. यामुळे बांधकाम विभाग मरण्याची तर वाट पाहत नाही ना, असे म्हणत प्रहारने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यलय गाठले. यावेळी खड्डे बुजविण्याच्या मागण्यांसह मुरूम व गिट्टी भेट देत निद्रीस्त असलेल्या विभागाला जागं करण्याचे काम केले. येत्या तीन दिवसांत ई-टेंडर प्रक्रिया पार पडली नाही तर रस्त्याची डागडुजी ही मुरूम टाकून करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी प्रहारचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनात सुधीर जाचक, गुड्डू पठाण, जुनेद सय्यद, मुकेश मस्के, माणिक नीमकर, विकास दमाये, राजू नांदूरकर, संजय कुरील, विक्रम भगत, राजीक कुरेशी, अंकुश गोटे, प्रणव गोवाड, कलीम भाई, फारुख खान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.