शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लोखंडी रॉड व दगडाने ठेचून एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:28 IST

दारूच्या नशेत घरी येवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची लोखंडी रॉडने मारून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी शास्त्री वॉर्ड परिसरात घडली.

ठळक मुद्देआरोपी फरार : पाच जणांकडून मारहाण झाल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : दारूच्या नशेत घरी येवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाची लोखंडी रॉडने मारून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी शास्त्री वॉर्ड परिसरात घडली. मृताचे नाव नांग्या उर्फ आशिष रमेश जवादे (२८) रा.शास्त्री वॉर्ड असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय त्याला पाच जणांनी मिळून ठार केल्याचा संशय पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून व्यक्त केला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास शास्त्री वॉर्डातील एमएसईबीच्या मुख्य कार्यालयाजवळ एका युवकाचा पाच जणांनी लोखंडी रॉड व दगडाने ठेचून खून केल्याची माहिती मिळली. या घटनेने शास्त्री वॉर्ड परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.घटनास्थळ गाठताच मृतकाची ओळख पटली. त्याचे नाव आशिष रमेश जवादे असे असल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी केली असता आशिष रात्रीच्या सुमारास वॉर्डातील बावणे याच्या घरी नशेत गेला होता. यावेळी त्याने बावणेला शिवीगाळ केली. यासंदर्भात त्याच्या पत्नीने आशिष जवादे याच्या विरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज सकाळी बावणेला रस्त्यात अडवून आशिष जवादे याने शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्याने ही घटना आपल्या मुलांना सांगितली. दरम्यान बावणे यांची मुले व आशिष समोरासमोर आल्याने याच कारणावरून बाचाबाची झाली. याच कारणावरून मारहाण झाली. यावेळी आशिष याने आणलेला लोखंडी रॉड हिसकावून त्याच्यावरच हल्ला केला. शिवाय रस्त्याच्यावरील दगड उचलून आशिषला मारहाण करण्यात आली. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान मारहाण करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी आशिषला परिसरातील नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याला मारहाण करणाºया पाच संशयित व्यक्तीची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, अमोल कोल्हे करीत आहेत.२४ तासांतील दुसरी हत्याहिंगणघाट शहरात घडलेली २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. गुरुवारी एका पेट्रोल पंपाजवळ युवकाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. त्या हत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.आशिष जवादे सौदी अरब येथे कामावरया प्रकरणातील मृतक आशिष जवादे हा सौदी अरब येथे एका तेल कंपनीत कामावर होता. मागील काही दिवसांपासून येथे आला होता. आशिष जवादे यांच्या तक्रारीवरून एक वर्षभरापूर्वी एका गुन्ह्यात टीन्या गवळी व त्याच्या साथीदारावर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता हे विशेष !ठाकरे हत्याप्रकरणात तिघे अटकेतयेथील सातेफळ मार्गावर काल रात्री मनोज बाबाराव ठाकरे (२२) या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन तडस, प्रतीक रघाटाटे, रितीक सोनटक्के या तिघांना अटक केली. मनोजची हत्या जुन्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Murderखून