शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कार्यालयाला स्वच्छतेचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:45 IST

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देभिंतींना जाळ्याचा विळखा : परिसरात कचऱ्याचे ढिगारे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरात स्वच्छ शहरासंदर्भात जागर केला जात आहे; पण ज्या कार्यालयाच्या खांद्यावर अस्वच्छतेला शहरातून हद्दपार करण्याची जबाबदारी आहे त्याच वर्धा न. प. च्या कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येते. शिवाय कार्यालयाच्या भिंतींना जाळ्याचा विळखा असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी, तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून रस्त्याच्याकडेला कचरा टाकणाऱ्या बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय पालिकेच्यावतीने ओला व सुका कचरा प्रत्येक घरातून घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. मात्र, जे कार्यालय वर्धा शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत शिस्त लावत आहे त्याच वर्धा न. प. कार्यालयातील कर्मचाºयांना कार्यालय व कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न कार्यालयाचा फेरफटका मारल्यावर नागरिकांकडून विचारल्या जात आहे. न. प. कार्यालयाच्या मागील भागात मोठा कचºयाचा ढिगारा मागील काही दिवसांपासून कायम आहे. तसेच कर विभागाकडे जाणाºया मार्गावरील भिंतीवर जाळे कायम असल्याचे दिसते. हा प्रकार स्वच्छ शासकीय कार्यालयाल या हेतूला छेद देणारा असल्याने न.प.तील संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.कार्यालयीन कामकाजाबाबत होतोय अपप्रचारन.प.च्या कार्यालयाच्या मागील भागात कचºयाचे ढिगारे कायम आहे. तेथील कचरा वेळीच उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त असताना त्याकडे पालिकेतील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर दारूच्या शिश्या पडून असून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना हा प्रकार सहज निदर्शनास पडतो. त्यांच्याकडून उलट-सुलट चर्चा होत आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यायेथील न. प. कार्यालयाच्या मागणी परिसरात गत काही दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा कायम आहे. इतकेच नव्हे तर या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून असल्याचे दिसते. दारूबंदी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या आवारातच दारूच्या रिकाम्या बाटल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सहज निदर्शनास येत असल्याने कार्यालयाच्या कामकाजाबाबत उलट-सुलट चर्चा नागरिक करीत आहेत.