शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

खासदारांनी घेतला क्रीडा संकुलातील सुविधांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:29 IST

खासदार रामदास तडस यांनी येथील जिल्हा क्रीडा संकुल गाठून तेथील सोई-सुविधांचा आढावा जाणून घेतला.

ठळक मुद्देझालेल्या व होणाऱ्या कामांची जाणून घेतली माहिती

आॅनलाईन लोकमतवर्धा : खासदार रामदास तडस यांनी येथील जिल्हा क्रीडा संकुल गाठून तेथील सोई-सुविधांचा आढावा जाणून घेतला. या क्रीडा संकुलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल असून क्रीडा संकुलातील सुविधांबाबत खा. तडस यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हा क्रीडा संकुल परिसरात खेळाडू व वयोवृद्धांसाठी व्यायाम शाळा तयार करण्यात आली आहे. तसेच अद्यावत इलेक्ट्रीक शुटींग रेंज तयार करण्यात आलेला आहे. या सुविधांचा खेळाडूंना फायदा होणार आहे. सध्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी या खेळाची मैदाने तयार होत आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्ट तयार केला आहे. जिल्हा क्रीडा संकुलात इन्डोर खेळांसाठी व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अ‍ॅकॉस्टीक हॉलची निर्मिती करण्यात आली असून लवकरच खेळाडूंसाठी व इतर कार्यक्रमासाठी ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.जिल्हा क्रीडा संकुल प्रकाशमय करण्यासाठी ४०० मीटर रनींग ट्रॅकवर व इतर भागात एल. ई. डी. लाईट लागत असून त्याचा सायंकाळी सराव करणाºया खेळाडूंना लाभ होणार आहे. या क्रीडा संकुलात एक सुसज्ज उपहारगृह बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवाल यांच्या संकल्पनेतून महसूल विभाग व जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन समिती तसेच बचत गटाच्या माध्यमातून ‘सायकल चालवा प्रदूषणाला आळा घाला’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात दहा सायकल जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अल्पश: भाडेतत्वावर त्या नागरिकांना दिल्या जातात. जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन समितीला शासनाकडून कुठल्याही देखभाल दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होत नाही याची माहितीही यावेळी खा. रामदास तडस यांनी जाणून घेतली. यामुळे खेळाडूंना विविध सुविधा मिळणार आहे.ओपन जिमची संकल्पना नाविण्यपूर्ण- तडसजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे तयार करण्यात आलेल्या ओपन जिमची संकल्पना नाविण्यपूर्ण आहे. या खुल्या व्यायाम शाळेचा नक्कीच मैदानी व विविध खेळ खेळणाºया खेळाडूंसह वृद्धांना फायदा होणार आहे. विविध खेळांचा नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी या ओपन जिमचा लाभ घेतला पाहिजे. खासदार म्हणून आपण जिल्हा क्रीडा संकुलात योग्य सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खा. तडस यांनी दिले.