शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातेने घेतला चिमुकल्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशचे दुसऱ्याशी अनैतिक सबंध असल्याचा आरोप करीत वाद घालायची.

ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न : पतीच्या तक्रारीवरुन पत्नीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पती-पत्नीच्या नेहमीच्या वादातून महिलेने सोळा महिन्याच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी धाव घेऊन महिलेला सुखरुप बाहेर काढले पण, सोळा महिन्याच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पती-पत्नीच्या वादात सोळा महिन्याच्या निरागस बालकाला जिव गमवावा लागल्याची घटना नजिकच्या सावालपूर येथे रविवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरुन पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.संघर्ष निंबाळकर असे मृत सोळा महिन्याच्या बालकाचे तर प्रिया शैलेश निंबाळकर (२३) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशचे दुसऱ्याशी अनैतिक सबंध असल्याचा आरोप करीत वाद घालायची. रविवारी रात्रीही याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.त्यानंतर साडेअकरा वाजताच्या दरम्यान शैलेश त्याचे वडील उकंडरावही झोपी गेले. रात्री बारा वाजताच्या दरम्यान घरासमोरील विहिरीत उडी घेतल्याचा आवाज आल्याने उंकडराव यांनी घरात बघितले असता प्रिया व संघर्ष दोघेही पलंगावर झोपलेले दिसले नाही. बाहेर त्यांना विहिरीच्या दिशेने कुत्रे जोरजोरात भुंकताना दिसले. त्यामुळे त्यांनी विहिरीकडे धाव घेऊन टॉर्चच्या सहाय्याने विहिरीत बघितले असता चिमुकला संघर्ष पाण्यावर तरंगताना तर सून प्रिया हातपाय हलविताना दिसून आली. त्यांमुळे त्यांनी आरडाओरड केल्यावर नागरिकांनी गोळा होऊन दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. यात प्रिया बचावली पण, संघर्षचा मृत्यू झाला.याप्रकरणी शैलेशने मुलाच्या मृत्यूस पत्नी प्रियाच जबाबदार असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलाच्या हत्येला आईच जबाबदार असल्याच्या गुन्हा दाखल करुन प्रियाला अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पिसे व गोपाल डोळे करीत आहे.पती-पत्नीचा वाद विकोपालापतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पत्नी नेहमीच पतीशी वाद घालायची. हा वाद विकोपाला गेल्याने सोळा महिन्याच्या चिमुकल्यासह आपणही आत्महत्या करुन या कटकटीतून मुक्त व्हावे, असा विचार करीत घरातील सर्व मंडळी झोपी गेले असता महिलेने चिमुकल्यासह विहिरीत उडी मारली. सासऱ्याला याची माहिती मिळताच आरडाओरड केल्यावर गावकऱ्यांनी धावाधाव करुन मायलेकांना बाहेर काढले. पण, चिमुकला मृतावस्थेत होता. या घटनेने चिमुकला देवाघरी तर माता कोठडीत गेली.

टॅग्स :Deathमृत्यू