निमगाव येथील घटना : बाळाचा मृत्यू, विवाहिता बचावलीदेवळी : घरघुती वाद विकोपाला गेल्याने नजीकच्या निमगाव येथील विवाहितेने आपल्या एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेतली. यात पाण्यात खोलवर गेल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. विहिरीतील खडकाचा आधार घेतल्याने विवाहितेचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. पोलीस सूत्रानुसार, निमगाव येथील सोनू संतोष मेश्राम हिने घरगुती कलहामुळे एक महिन्याच्या बाळासह गावातील विहिरीत उडी घेतली. ही घटना पहाटे चार वाजताची असल्याने ती कुणाच्याही लक्षात आली नाही. दिवस उजाडल्यानंतर गावातील महिला विहिरीतील खडकाला पकडून असल्याचे पाणी भरणाऱ्या महिलांच्या लक्षात आले. सदर महिलेला पाण्याबाहेर काढले असता तिने बाळ पाण्यात असल्याचे सांगितले. यावरून बाळाचा शोध घेतला असता बुधवारी सकाळी बाळ मृतावस्थेत आढळून आले. बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपी महिलेवर भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
मातेने बाळासह घेतली विहिरीत उडी
By admin | Updated: October 8, 2015 01:44 IST