शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मदर टेरेसांनी कुठलेही चमत्कार केले नाही

By admin | Updated: January 9, 2016 02:36 IST

चमत्कार कधीही कुणीही करू शकत नाही याचा पुरावा राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडला आहे.

पंकज वंजारे : चमत्कार चिकटवून त्यांच्या समाजसेवेचा अपमानवर्धा : चमत्कार कधीही कुणीही करू शकत नाही याचा पुरावा राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडला आहे. मदर टेरेसा यांनी केलेली समाजसेवा ही जगद्गुरू तुकारामांच्या व्याख्येप्रमाणे संत म्हणून सिद्ध होते. त्यांनी चमत्कार केला म्हणून त्यांना चर्च संतपद देत असेल तर हा संतपदाचा, संताचा अपमान आहे. मदर टेरेसांनी कुठलेही चमत्कार केले नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हासंघटक पंकज वंजारे यांनी केले. समुद्रपूर तालुक्यातील वासी येथील श्री संत हरिबाबा गुरूदेव सेवा मंडळच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल, जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, पंचायत समितीचे सदस्य धनपाल भगत, हिंगणघाट तालुका अध्यक्ष मनोज गायधने, समुद्रपूर तालुकाध्यक्ष उमेश पोटे, तालुका संघटक प्रफुल कुडे, उल्हास बाभूळकर, राहुल वंजारे, आशिष पडोळे उपस्थित होते. वंजारे म्हणाले, मदर टेरेसा यांनी कुठलेही चमत्कार केलेले नाही. ज्या रोग्यांना दुरूस्त करण्याचा दावा चमत्काराच्या माध्यमातून होत आहे ते अर्धसत्य असून वैद्यकीय उपचारातून रूग्ण बरे झाल्याचा दावा पंकज वंजारे यांनी केला. जाहीर सभेत कथित चमत्कार सिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी चर्चच्या पोपला दिले.जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी जादूटोणा विरोधी कायद्याची पार्श्वभूमी विशद करीत कायद्यातील महत्वाची कलमे, कायद्यानुसार शिक्षेचे स्वरूप, दक्षता अधिकाऱ्यांची व नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भात उपयुक्त माहिती दिली. अ. भा. अंनिसची ‘आमचा देवाधर्माला विरोध नाही’ ही भूमिका व चळवळीची वाटचाल यासंदर्भात तालुकासंघटक प्रफुल कुडे यांनी माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल यांनी केले. संचालन सुधाकर राऊत यांनी केले तर आभार वासुदेव दारूणकर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)