शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मोझरी-कानगाव रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:16 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंअर्गत गावागावापर्यंत मजबुत डांबरीकरण रस्ते तयार करण्यात आले; परंतु काही वर्षांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

ठळक मुद्देवाहतूक वाढली : रस्त्याच्या विस्ताराचा मात्र सर्वांना विसर

लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी(शे.) : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंअर्गत गावागावापर्यंत मजबुत डांबरीकरण रस्ते तयार करण्यात आले; परंतु काही वर्षांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. कानगाव ते मोझरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या कडा खचल्या आहेत. यामुळे अपघाची शक्यता बळावली असून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.कापसी मार्गे राळेगाव जाण्याकरिता हा मार्ग कमी अंतराचा असल्याने यावर वाहतूक वाढली आहे. या वाढलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग आता तोकडा पडत आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते कानगाव पर्यंतच असल्याचे दिसत आहे. कानगाव समोर हा रस्ता अरंद आणि खड्डेमयच राहणार असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खचलेल्या सार्डड यामुळे येथे रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची मोठी भीती असते. यातच या मार्गे वर्धा नदीतून रेती घेवून येत असलेल्या वाहनांची वर्दळ असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहे. यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली असून याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.मोझरी(शे.) कानगाव हा मार्गाचा काही भाग खड्डेमय झाला आहे. सोबतच वाहतूक वर्दळीचा विचार करता मार्गाचे रुंदीकरण करणे महत्त्वाचे आहे. मोझरी(शे.),कोसुर्ला, मनसावळी हा मार्ग पूर्णत: डांबर उखडून रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावर केवळ खड्डेच नाही तर रस्त्याच्या कडेला झुडपांचा विळखा पडला आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याची माहिती या भागातील लोकप्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांच्याकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर पुलगाव देवळीकडून आजनसराकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मोझरी, खानगाव, आंबोडा हा मार्ग पूर्णत: खड्डेमय स्थितीत आहे. याकडे विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. मोझरी(शे.)-पोटी मार्गाचे अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. नाल्यावरील पुलांची स्थिती खराब आहे. मोझरी -कापसी हा ६ कि़मी. मार्ग दुर्लक्षित असून या मार्गाचे साधे खडीकरणही करण्यात आल नसल्याचे वास्तव आहे.