लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही अद्याप सुधारणा झाली नसल्याचा 'प्रथम एज्युकेशन फाउंडेशन'ने केलेल्या, अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन' असरचा अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये २०२४ मध्ये तिसरी ते पाचवीच्या ५१.६ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गाचे मराठी (भाषा) पुस्तक वाचता येत नाही. गणितात मात्र ५३.३. टक्के विद्यार्थी हुशार आहेत.
सहावी ते वर्ष २०२४ मध्ये आठवीच्या २४.३ टक्के विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही; मात्र ४७ टक्के विद्यार्थ्यांना अंकगणित करता येतात. वर्ष २०२२ च्या असरच्या तुलनेत वर्ष २०२४ मध्ये गणितात मुले हुशार झालेली दिसत आहेत. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. तथापि, तो फारसा प्रभावी ठरल्याचे दिसत नाही. जिल्हा परिषद व प्रथम यांच्या संयुक्त विद्यमाने 'शैक्षणिक गुणवत्ता वाढ' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
केंद्रनिहाय मंथन सभाअसरचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर केंद्रनिहाय मंथन सभाचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत
या अभियानाची कार्येदेशभरातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण केले जाते.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत
शिक्षणाची खरी परिस्थितीजिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राची ग्रामीण भागातील खरी परिस्थिती या निमीत्ताने समोर आली आहे. याला शिक्षक संघटनांकडून विरोध होत असला तरी जिल्हा परिषदेच्या शाळेसह खासगी शाळांचीही स्थिती अशिच असल्याचे या निमीत्ताने पुढे आले आहे. मात्र खासगी शाळांसंदर्भात कुणी बोलत नाही हा भाग वेगळा आहे असे शिक्षण विभागातच चर्चा सुरू आहे.
गणितात पुढे मात्र, भाषेत मागेवर्ष २०२४ असरच्या अहवालात तिसरी ते पाचवीच्या ४८.४ टक्के विद्यार्थ्यांना वाचन करता येते; मात्र ५२.६ टक्के विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही; परंतु तिसरी ते पाचवीच्या ५३.३ विद्यार्थ्यांना गणित करण्यात मध्ये पुढे आहेत.
असरचा अहवाल काय म्हणतो?सन वाचन ३ ते ५ वाचन ६ ते ८ वजाबाकी ३ ते ५ भागाकार ६ ते ८२०१६ ७६.४ ६६.९ ४४. ४ ३३.९ २०१८ ५७.३ ८०.३ ५२.७ ४९.२ २०२२ ५२.६ ७७.५ ३९.० ३४.०
"वर्ष २०२४ मध्ये असरचा अहवाल बघितला आहे. त्यात कुठे कमी पडलो यांचे विश्लेषण करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील."- मंगेश घोगरे, प्राचार्य डाएट वर्धा