वर्धा : विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत; पण प्रत्येक घरातील लहान मुलेही आता या मोबाईलच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे़ पालकांनी लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे धोक्याचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. खेळणे समजून बालक मोबाईलचा अट्टाहास करतात; पण याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असताना पालक दुजोरा देताना दिसतात़ मोबाईलमधून निघणाऱ्या ध्वनीलहरी सर्वांना घातक असतात. १२ वर्षांपूर्वी भ्रमणध्वनी खर्चिक व महागडा होतो़ यामुळे काहीच नागरिकांकडे तो दिसत होता; पण आज घरोघरी मोबाईल खेळण्यासारखे वापरले जातात़ सिमकार्डही गल्ली-बोळात लहान-मोठ्या दुकानांत सहज मिळतात़ परिस्थितीनुसार मोबाईलच्या आकार, प्रकारात आमुलाग्र बदल झाला़ टचस्क्रीनचे मोबाईलही ऐपतीत मिळत असल्याने ते सर्वत्र वापरले जातात़ लहान मुलेही वडिलांचा, काकांचा, भावाचा मोबाईल वेळ मिळेल तेव्हा घेऊन बसतात. त्यांचा बराच वेळ गेम खेळण्यात जातो़ खेळण्याच्या नादात ते जेवण, अभ्यास विसरतात़ अनेकदा फोन करण्यासाठी थोरांना मोबाईल लागतो, तेव्हाही मुले मोबाईल द्यायला तयार नसतात. याकडे दुर्लक्ष केल्याने मुले हट्टी होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात़ टचस्क्रीन मोबाईलमुळे डोळ्यांचे आजार व चष्म्याचे प्रमाण वाढत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
मोबाईल खेळणे लहान मुलांसाठी धोक्याचे
By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST