शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शिक्क्याने एफडी तयार करून महिलेला लुबाडणाऱ्या मनसे शहराध्यक्षाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:55 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याला अटक केली आहे.

वर्धा - बॅचलर रोडवर असलेल्या मुरारका ले-आऊट परिसरातील एका रहिवासी महिलेची बनावट एफडी तयार करून तिच्याकडून दोन लाख रुपये हडप केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काल दि. २२ मार्च रोजी रात्री रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शुभम जळगावकर यास अटक केली आहे.मनसेचे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने खोटा दस्ताऐवज तयार करून स्टेट बँक ऑफ इंडिया शिवजी चौक शाखेतील ग्राहक वैशाली सुनिल वकारे यांचे बनावट एफडीचे कागदपत्र तयार केले. तसेच बँकेचे बनावट शिक्के मारून महिलेकडून एफडीच्या नावे दोन लाख रुपये उकळले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. सदर महिला मात्र, यापासून अनभिज्ञ होती. काल २२ रोजी वैशाली वकारे या शिवाजी चौक येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या असता त्यांनी एफडी दाखवून चौकशी केली तेव्हा बँक व्यवस्थापनाकडून सदर एफडी बनावट असल्याचे उघडकीस आले. सदर महिलेने याबाबत बँक व्यवस्थापकाशी संपर्क केला असता त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इंदोर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे स्टेट मॅनेजर गोविंद चव्हाण यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याच्यावर ४२०, ४६८, ४७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यास काल रात्री अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेंद्रसिंह यादव करीत आहे. तपासात आणखी बनावट एफड्या उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करीत आहे.