लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील धोत्रा (कासार) येथील विठ्ठल गणपत पोहाणे यांच्या शेतातून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून हे उत्खनन धोकादायक ठरत आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी गावातील उपसरपंच चंदू पोहाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.विठ्ठल गणपत पाहोणे यांच्या मालकीचे १.१७ हेक्टर शेत आहे. या शेतातून त्रिवेणा इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीने शासनाची कुठलीही परवानगी न घेता मुरुमाचे उत्खनन सुरु केले आहे.या उत्खननामुळे आजुबाजुच्याही शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतात जवळपास दहा फुट खोल खड्डे तयार झाले असून येत्या पावसाळ्यात ते लगतच्या शेतकऱ्यांच्या जनवारांसाठी जीवघेणे ठरणार आहे. त्यामुळे या अवैध उत्खननावर त्वरीत प्रतिबंध घालावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहिल, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागणीकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांना आहे.
शेतातून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:08 IST
तालुक्यातील धोत्रा (कासार) येथील विठ्ठल गणपत पोहाणे यांच्या शेतातून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून हे उत्खनन धोकादायक ठरत आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी गावातील उपसरपंच चंदू पोहाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. विठ्ठल गणपत पाहोणे यांच्या मालकीचे १.१७ हेक्टर शेत आहे. या शेतातून त्रिवेणा इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीने शासनाची कुठलीही परवानगी न घेता मुरुमाचे उत्खनन सुरु केले आहे.
शेतातून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन
ठळक मुद्देउपसरपंचाची तक्रार : धोत्रा (कासार) येथील प्रकार