लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : चारही भोवताल पाणी, नैसर्गीक सौदर्यानं नटलेलं, काळी कसदार जमिन असल्याने कधीकाळी सपन्न असललं आर्वी तालुक्यातील मिर्झापूर (नेरी) हे एक गावं. विकासाच्या ओघात अचानक भकास झालं. शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्याने जमिनदारांच गावं आता भूमिहीनांच झालं. त्यातच कोरोनासारख्या महामारीच्या लॉकडाऊनमुळे रोजगारही हिरावल्या गेल्याने प्रत्येकांना भुकेची भ्रांत पडली आहे. त्यामुळे गावातील एकही व्यक्ती उपाशापोटी राहू नये यासाठी सामाजिक संस्थासह दानशुरांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी हाक दिली आहे.गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून गावकरी महामारीच्या संकटाशी दोन हात करीत आहे. कधी दुष्काळाच्या स्वरुपात तर कधी बेरोजगारीच्या. अत्यावश्यक सोयी सुविधांपासून हे गाव कोसो दूर असल्याने येथील तरुणपिढीही उच्च शिक्षणापासून वंचित आहे.मिर्झापूर (नेरी) हे गाव भूमिहीन झाले असून सध्या १५५ परिवार या गावात वास्तव्यास आहे. या सर्वांच्या जमिनी अल्प मोबदल्यात सिंचनाकरिता घेण्यात आल्याने सर्वच ग्रामस्थ आज बेघर व भूमिहीन झाले आहे. दहा वर्षानंतर आता काही लोक स्वत: चा निवारा उभारण्यात यशस्वी झालेले आहेत. येथील बहूतांश ग्रामस्थांची हातावर आणून पाणावर खाने, अशीच अवस्था आहे. ग्रामस्थांनी मोलमजुरी करुन उन्हाळ्याची सोय म्हणून घरात किराणा व धान्य साठवून ठेवले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ते संपून गेले. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळाले पण, ते शिजविण्यासाठी आवश्यक असलेला किराणा आणायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाला घेण्यासाठीही, अचानक वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास गाठीशी पैसे नाहीत. गावातील तरुण मंडळी जवळच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये कामाला होते.पण, महिन्याभरापासून फॅक्टरी बंद असल्याने तेही बेरोजगार झाले आहे. गावात काही वयोवृद्ध, निराधार मंडळी असून येत्या दिवसात काय होईल, याची चिंता सतावत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना मदतीची प्रतीक्षा आहे.श्रमदानातून ग्रामपंचायत झाली ‘स्मार्ट’, दुष्काळग्रस्त भागात पाणी एटीएम सुरू करणारी पहिली ग्रामपंचायतनिम्न वर्धा प्रकल्पात गाव गेल्यानंतर दुष्काळी भागात या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावकऱ्यांच्या एकोप्याने या गावात २०१७ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली. गावकºयांनी बिनविरोध गावातील युवकांच्या हाती नेतृत्व दिले. सर्व गावकºयांच्या मदतीने आदर्श ग्रामपंचायत करण्याची वाट धरली. २०१८ मध्ये या गावाने गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळविला. २०१९-२० मध्ये तालुका व जिल्ह्यातून स्मार्ट ग्राम हा पुरस्कारही पटकाविला. दुष्काळी परिस्थितीव मात करण्यासाठी गावकºयांनी श्रमदानातून पाणलोटाची कामेही केली. शाश्वत अशी पाणी व्यवस्था करुन जिल्ह्यातील पहिली वॉटर एटीएम असलेल्याचा बहूमान या ग्रामपंचयातीने मिळविला. सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करुन नागरी सुविधा पूर्ण करण्यात सुद्धा काही प्रमाणात यश आले आहे.दुष्काळी भागात पुनर्वसन झाले तरीही गावकºयांची जिद्द आणि श्रमदानातून गावाचा विकास साधल्या गेला आहे. ९० टक्के ग्रामस्थ रोजंदारीवर जगणारे असल्याने या लॉकडाऊनच्या काळात मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वांच्या श्रमदानातून आदर्श ग्राम झालेल्या या गावाला सध्या कोरोनाच्या महामारीतून सावरणे अश्यक्य होत आहे. आधीच प्रकल्पामुळे महामारीचा सामना सुरु असताना त्यात लॉकडाऊनने आणखी भर घातली आहे. ज्याप्रमाणे सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व दानशुरांनी गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी साथ दिली. त्याचप्रमाणे ही उपासमारी थांबविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा.बाळा सोनटक्के, उपसरपंच, मिर्झापूर (नेरी)
मिर्झापूर,भूमिहीनांचं एक गाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST
गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून गावकरी महामारीच्या संकटाशी दोन हात करीत आहे.
मिर्झापूर,भूमिहीनांचं एक गाव...
ठळक मुद्देसंचारबंदीत रोजगार हिरावला : पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामस्थांकडून मदतीची हाक