शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

मिरणनाथ महाराज संस्थानवर देवस्थानच्या दोन गटांचा दावा

By admin | Updated: November 29, 2014 23:24 IST

हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित

देवळी : हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी १३६ व्या पुण्यतिथी महोत्सवावर अधिकार सांगत पत्रकबाजी केल्याने गोंधळ उडाला़़ शासनाने या बाबीची गंभीर दखल वाद सोडवावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्र्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी एका गटाचे पुंडलिक उघडे व उदय काशीकर यांनी सुदाम महाराज घवघवे तर दुसऱ्या गटाचे किशोर फुटाणे व दिनकर अंबरकर यांनी सुरेंद्र महाराज मुळे यांचा श्रीमद् भागवत सप्ताह व धार्मिक कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केला. येथून खऱ्या अर्थाने वादाला तोंड फुटले; पण वेळेपर्र्यंत देवस्थानच्या एका गटाने माघार घेतल्याने घवघवे यांच्या भागवत प्रवचनाने पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला़ देवस्थान कमिटीचा सर्वाधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा दोन्ही गटात मागील वर्षापासून तणावाची स्थिती निर्माण करीत आहे. आरोप-प्रत्यारोप व धमक्यांबाबत यापूर्वी दोन्ही गटांनी पोलिसांत तक्रार केली आहे़ १८७८ पासून पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा आहे. प्रारंभी शिवराम महाराज व नंतर रामजी व किशोर फुटाणे यांनी वंशपरंपरेचा घटनात्मक आधार घेत देवस्थान कमिटीचे कामकाज पाहिले; पण १० वर्षांपूर्वी देवस्थानची सात सदस्यीय कार्यकारिणी गठित झाली़ यात पुंडलिक उघडे यांची अध्यक्षपदी, किशोर फुटाणे यांची सचिवपदी तर ट्रस्टी म्हणून उदय काशीकर व इतर ४ जणांची निवड झाली; पण सध्या देवस्थान कमिटीचे ४ ट्रस्टी मृत झाल्याने उर्वरित ट्रस्टी उघडे, काशीकर व फुटाणे यांच्यात सरळ दोन गट पडले. दोन्ही गटांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेगळ्या कमिट्या गठित करून चेंज रिपोर्ट पाठविले़ यात शासकीय हस्तक्षेप गरजेचा झाला असल्याचे बोलले जात आहे़(प्रतिनिधी)