शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिघी (होणाडे) येथील गौण खनिज चोरीकडे महसूलचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

आर्वी तालुक्यातील दिघी (होणाडे) या गावाच्या जुन्या वस्तीला लागून असलेल्या महसूली जागेतून ५०० टिप्परपेक्षा

ग्रामस्थांना आश्चर्य : माहिती देऊनही कारवाईस टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आर्वी तालुक्यातील दिघी (होणाडे) या गावाच्या जुन्या वस्तीला लागून असलेल्या महसूली जागेतून ५०० टिप्परपेक्षा अधिक मुरूम अनधिकृतरीत्या खोदून नेण्यात आला. रेती चोरून नेणाऱ्यांनी आता आपला मोर्चा मुरूम चोरीकडे वळविल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आर्वी तालुक्यातील दिघी या गावाच्या शेजारून वर्धा नदी वाहते. येथील घाटाचा महसूल विभागाने लिलाव केला नाही. तेथे असलेल्या रेतीवर चोरट्यांनी डोळा ठेवून अनधिकृतरित्या प्रचंड प्रमाणात रेती चोरून नेली. चोरलेली रेती ही दिघी (होनाडे) येथील रेती घाटातील आहे. याबाबतची माहिती असताना आर्वीचा महसूल विभाग कारवाई करण्यास तयार नाही. रेतीघाटावर जाण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्याच्या शेजारी महसूल विभागाची मोठी जागा आहे. या जागेत मुरुमाचे प्रमाण अधिक असल्याने रेती चोरांनी तेथील मुरूम उत्खन्नाला प्रारंभ केला आहे. चोरलेला मुरुम काही प्रमाणात निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याशेजारी रस्त्यासाठी वापरला गेला तर काही मुरूम रेती वाहून नेणाऱ्या वाहनांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून रस्त्यावर टाकण्यात आला. मागील ५ ते ७ दिवसांत पोकलँडच्या साह्याने अविरत खोदकाम करीत मोठा खोल खड्डा तयार करून ठेवण्यात आला आहे. ही बाब दिघी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बुधवार पोकलँड व ट्रक घटनास्थळावर पकडला. सरपंचांनी उपविभागीय महसूल अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तेव्हा महसूल अधिकारी मी प्रवासात आहे, असे सांगत होते. तहसीलदारांचा दूरध्वनी उचलला गेला नाही. नायब तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना माहिती दिली. त्यांनी कारवाई करतो, असे सांगितले; पण घटनास्थळी कुणीही गेले नाही. रात्री ग्रामस्थांनी ट्रकच्या चाकांतील हवा काढली व घरी निघून आले. चोरट्यांनी ही संधी साधत घटनास्थळावर उभे असलेले पोकलँड पळविले व ट्रक तेथेच ठेवला. गुरुवारी दुपारपर्यंत महसूल विभागाचा तलाठी, मंडळ अधिकारी वा नायब तहसीलदार पोहोचले नाही. अखेर पुन्हा तहसीलदार पवार यांना दूरध्वनीवर विचारणा करण्यात आली. तेव्हा मंडळ अधिकारी पंचनामा करतील व ते जाणार होते, असे उत्तर देण्यात आले. लाखो रुपयांच्या गौण खनिजाची दिवसाढवळया चोरी होत आहे. ग्रामस्थ वाहने पकडून घटनेची माहिती देत आहे; पण अधिकारी कारवाई करण्यास तयार नाही, अशी दयनिय स्थिती आर्वी महसूल विभागाची आहे. गौण खनिज चोरून नेणाऱ्यांची माहिती महसूल विभागाला आहे. त्यांच्यासोबत महसुली अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. यामुळेच रेती वा गौण खनिज चोरी रोखण्यासाठी आमचे बंद डोळे उघडणार नाही, असा मुकसंदेश अधिकारी देत असल्याचे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.