शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन ट्रकच्या धडकेत मिनीडोअरचा चुराडा

By admin | Updated: March 27, 2017 01:06 IST

पुलगाव-देवळी मार्गावरील अपघातग्रस्त वळणावर दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली.

एकाचा मृत्यू : एक गंभीर पुलगाव : पुलगाव-देवळी मार्गावरील अपघातग्रस्त वळणावर दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक झाली. या धडकेत एक मिनीडोअर मध्ये अडकल्याने त्याचा पुरता चुराडा झाला. या भीषण अपघातात मिनीडोअर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. अंबादास अरुण कनकर (२६) असे मृतकाचे तर सुभाष फकीरचंद मुंधरे (३०) असे जखमीचे नाव असून दोघही वाशिम जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मिनीडोअरचा चुराडा झाल्याने त्याला उचलण्याकरिता क्रेनचा वापर करावा लागला. मिनीट्रकमधील मासोळ्या रस्त्यावर पुलगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरा-समोरा आलेल्या दोन ट्रकमध्ये जबर धडक झाली. या अपघातात मासे घेवून वाशिमकडून नागपूरकडे जाणाऱ्या मिनीडोअर एम.एच.३७ जे. १६८७ क्रमांकाच्या मिनीडोअरचा चुराडा झाला.एम.एच.०६ ए.जी. १६२७ क्रमांकाचा ट्रक लोहा घेवून तर एम.एच. ३६ एफ. ५००१ क्रमांकाचा ट्रक धान्याची पोती घेवून जात होता. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या मिनीडोअरचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या मिनीडोअरला क्रेनच्या सहाय्याने उचलून रस्त्याच्या बाजूला करावे लागले. या अपघातात अंबादास अरूण कनकर (२६) रा. गौदेश्वर जि. वाशिम याचा मृत्यू झाला तर सुभाष फकीरचंद मुंधरे (३०) रा. गौळीपूरा वाशिम हा जखमी झाला. जखमीला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात होताच दोन्ही ट्रकच्या चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहे. घटनेदरम्यान रस्त्यावर मिनीडोअरमधील माशांचा सडा पडला होता. यामुळे बराच वेळपर्यंत वाहतूक खोळंबली होती.(तालुका प्रतिनिधी)गतिरोधक आहे, पण पांढरे पट्टे नाहीतनागपूर औरंगाबाद या द्रुतगती मार्गावर देवळी वळणावर दोन ठिकाणी उंच असे गतिरोधक बसविण्यात आहे. परंतु, सीएडी कॅम्पपासून या वळणापर्यंत कुठेही गतिरोधकाला पिवळे किंवा पांढरे मार्किंग तसेच झेब्रा क्रॉसींगही नसल्यामुळे गतिरोधक सहज दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचदा वाहन अनियंत्रीत होते. याच वळणावर यापूर्वीही असे अनेक अपघात झाले. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.