धडक देवून मिनिडोअर चालक फरार आर्वी : दुचाकीने चांदूर रेल्वेकडे जात असताना भरधाव मिनिडोअरने दुचाकी चालकाला चिरडले यात दुचाकी स्वार गजानन किसन नारनवरे रा. शिरपूर (बोके) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आर्वी देऊरवाडा मार्गावर गुरूवारी सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास घडली.पोलीस सुत्रानुसार, शिरपूर (बोके) येथील गजानन नारनवरे हे त्यांची दुचाकी क्र. एम.एच. ३२ ए.बी. ०९२३ ने चांदूर (रेल्वे)कडे जात होते. दरम्यान त्यांना एम.एच.४२ बी. ३३६९ क्रमांकाच्या वाहनाने धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला. यावेळी मिनिडोअरचे चाक गजानन यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मिनिडोअर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती दिनेश नारनवरे यांनी दिलेल्या माहितीवरून अज्ञात इसमावर भादंविच्या कलम ३०४ अ, अन्वये गुन्हा दाखल आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)
मिनिडोअरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: April 29, 2016 02:01 IST