शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कारंजा येथे सुशिक्षित बेरोजगारांना लाखोेंचा गंडा; टोळी सक्रिय

By admin | Updated: October 14, 2016 02:44 IST

तळेगाव येथील एका शिक्षकासह त्याच्या भावाने नोकरीचे आमिष देत कारंजा येथील युवकाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

आष्टी (शहीद) : तळेगाव येथील एका शिक्षकासह त्याच्या भावाने नोकरीचे आमिष देत कारंजा येथील युवकाला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर सुशिक्षित बेरोजगार पैसे परत मागण्यासाठी समोर आले आहे. या प्रकरणात पैसे देण्यास होणार दिल्याने अद्याप पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नाही. यामुळे परिसरात सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे देत लुबाडणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. उच्च शिक्षितांना बनावट माहिती देत नोकरीचे आमिष देणारी टोळी गत वर्षभरापासून तालुक्यात सक्रिय झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळण्याचे काम येथे सर्रास सुरू आहे. यामध्ये काही शिक्षण विभागातील कर्मचारी असल्याची चर्चा जोरात आहे. कार्पोरेशन बँक, खाजगी महाविद्यालयातील माहितीचे बुकलेट आणून सुशिक्षित तरुणांना दाखविण्याचे काम या टोळीकडून सुरू आहे. कारंजा (घा.) तालुक्यामधील एका तरुणाकडून कार्पोरेशन बँकेत नोकरी देण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळण्यात आले. आता नोकरी लागली नाही म्हणून या तरुणाने तळेगाव येथील फसविणाऱ्या दलालास पैसे परत मागितले असता त्या दलालाने आपल्या भावाकडे पैसे असल्याचे सांगितले. त्याचा भाऊ एका नामांकित विद्यालयात शिक्षक आहे. तिघांकडून घेतले साडेचार लाख आर्वी येथील तीन तरुणांकडून तळेगावच्या या दलालाने प्रत्यकी दीड लाख याप्रमाणे साडेचार लाख रुपये घेतले आहे. नोकरी लागली नसल्याने त्यांनी पैसे परत मागायला तगादा लावला आहे. मात्र कोणीही पोलिसात तक्रार दिली नाही. या टोळीमधील भामट्यांनी निव्वळ आर्थिक लुट चालविली आहे. त्यांना पोलीस खाक्या दाखविल्याशिवाय पैसे परत मिळणे कठीण झाले आहे. अशाचप्रकारे गत अनेक दिवसांपासून नोकरीच्या नावाखाली ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना लुबाडणूक करणारी टोळी विविध फंडे देवून वावरत असल्याने त्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)