शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:19 IST

नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता.

ठळक मुद्देकारवाईसाठी शेतकºयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात असून आता सदर ग्रुपने चक्क समुद्रपूर तालुक्यातील काही शेतकºयांची खोटे आमिष देत लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांची आहे.अरबोस ग्र्रुपच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना त्यांच्या शेतात अश्वगंधा हे उत्पन्न लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून अकरा महिन्याचा करार करून घेतला. इतकेच नव्हे तर सदर करार करताना शेतकºयांना ‘तुम्हाला लाखों रुपयांचा फायदा होईल’ असे सांगत ‘घेतल्या जाणाºया उत्पन्नाच्या कमीत कमी ३५ टक्के नफा तुम्हाला देऊ’ असेही सांगितले. शेकडो शेतकºयांनी अरबोस ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन यंदा शेतामध्ये कुठलेच पारंपारीक पीक घेतले नाही. तसेच सदर ग्रुपने करार केलेल्या शेतकºयांच्या शेतात कुठल्याच पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगामात शेतकºयांना आपल्या शेतजमीनी पडीक ठेवाव्या लागल्या. सदर प्रकारामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोळसले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फसवणूक झालेल्या शेतकºयांचे म्हणणे आहे. याच ग्रुपने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घातला असून सदर प्रकार लक्षात येताच फसवणूक झालेले तरुण-तरूणींनी शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना त्यावेळी दिली होती. परंतु, अद्यापही या ग्रुपच्या अधिकाºयांवर कुठलीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांसह तरुण-तरुणींची आहे.सांगितली आपबितीच्सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या शेतकºयांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांना दिले. पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अमर चंद्रकांत पसारे, काशीनाथ गो. इटनकर, नितेश सातपुते, प्रमोद देहाकर, सुभाष नवघरे, प्रवीण मेश्राम, विजय नासरे या फसवणूक झालेल्या बेरोजगारांसह अतुल कोल्हे, वासूदेव कोल्हे, प्रमोद देशकर, समीर जुगनाके, रोशन सहस्त्रबुद्धे आदी फसवणूक झालेल्या शेतकºयांची स्वाक्षरी आहे.सदर प्रकरणी कार्यालयात तक्रार शेतकºयांनी दिली आहे. चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.-निर्मलादेवी एस. पोलीस अधीक्षक,वर्धा