शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

दूध उत्पादकांचे सव्वा कोटीचे चुकारे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:45 IST

वर्धा जिल्हा दूध महासंघाचे शासनाकडे माहे डिसेंबर पासूनचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचे अडकले आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध सहकारी संस्था डबघाईस आल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पुरक व्यवसाय धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देदूध सहकारी संस्था डबघाईस : शेतीपूरक व्यवसाय धोक्यात

मोईन शेख।लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी): वर्धा जिल्हा दूध महासंघाचे शासनाकडे माहे डिसेंबर पासूनचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचे अडकले आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध सहकारी संस्था डबघाईस आल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पुरक व्यवसाय धोक्यात आला आहे. चुकारे अडल्याने या भागातील दूध उत्पादक आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांकडे पशुखाद्य घेण्यास आता पैसे नसल्यामुळे दूध उत्पादन करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे.शासनाने १ डिसेंबर १७ पासून ते आतापर्र्यंत दूध चुकारे दिले नाही. दूध संघाचे किमान १ कोटी २५ लक्ष रूपये थकल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शासन स्तरावर दूध उत्पादक संस्थेच्या बैठका घेऊन संस्थेला दूध वाढविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येते. बिनव्याजी कर्ज देत गायी, म्हशी घेण्याकरिता प्रोत्साहीत केले जाते. यातून दुधाचे उत्पादन निघताच विकलेल्या दुधाची रक्कम दिली नसल्याने ही जनावरे जगवायची कशी असा प्रश्न दुधउत्पादकांसमोर उभा ठाकला आहे.शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे. अशात शासनाच्यावतीने चुकारे देण्यात येत नाही. यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंजी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष मनोहर राऊत व संचालक रूपराव मोरे यांनी दूध महासंघाला दूध चुकाऱ्यांकरिता प्रत्यक्षात दूध संघाचे कार्यकारी संचालक पाटील व दूध संघाचे अध्यक्ष सुनील राऊत यांची भेट घेऊ दूध चुकाऱ्याबद्दल विचारणा केली. जोपर्र्यंत शासनाकडून चुकारे येणार नाही तो पर्यंत ते देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर वर्धा जिल्हा दूध डेअरी व्यवस्थापक आरमोरीकर याची भेट घेऊन त्यांना चुकाऱ्याविषयी विचारणा केली असता प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. चुकाऱ्यांकरिता दूध उत्पादकांना किती दिवस वाट बघावी लागेल हे सांगणे कठीण आहे.दूध वाढवा अन् खासगी डेअरीला द्यावर्धा जिल्हा संघाला शासनाने ७ हजार लिटर दररोज दूध घेण्याकरिता सूचना केल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात ८ ते ९ हजार लीटर संघाकडे येत असल्यामुळे शासन दूध घेण्यास नकार देत आहे. शासकीय दूध डेअरीमध्ये विनाकारण जास्तीचे निकष लावून दूध परत केल्या जात आहे. एकीकडे दूध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सरकार प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे दूध घेण्यास नकार देत आहे. यामुळे दूध वाढवा, पण ते शासनाला नाही तर खासगी दूध डेअरीला द्या असा अप्रत्यक्ष संदेश शासन देत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत. अशा निर्णयामुळे शेतकरी दूध उत्पादकांची दोन्ही बाजूने कोंडी होत आहे.