शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जिल्ह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: September 10, 2016 00:33 IST

सण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे.

प्रशांत हेलोंडे  वर्धासण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे. सर्वांचा आवडता बाप्पाच्या उत्सवाची वाट पाहत असतात. हरितालिका, गणेशोत्सव आणि गौरीच्या आवाहनासाठी मग, बाजारपेठाही त्याच पद्धतीने सजतात. वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठाही सजल्या आणि त्याच प्रमाणात मोठी उलाढालही झाली. तीन ते चार दिवसांतच जिल्ह्यात तब्बल एक ते दीड कोटींच्या वर उलाढाल झाल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाची तयारी भाविक उत्साहाने करतात. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीकरिताही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सुबक सजावट, रोषणाई करून बाप्पाला दहा दिवसांकरिता विराजमान केले जाते. दररोज पूजा, आरती होते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून येते. सार्वजनिक व घरगुती गणेशाच्या आगमनापूर्वी सजावटीवर विशेष भर दिला जातो. यासाठी बाजारात थर्माकोलची मंदिरे, विविध रंगांचे प्लास्टीकचे सजावट साहित्य, रोषणाईसाठी विविध प्रकारच्या सिरीज यासह अन्य सुशोभिकरणाचे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. जिल्ह्यात २५ लाख रुपयांचे सजावटीचे साहित्य विक्रीस आले होते. यातील १० लाखांपेक्षा अधिक साहित्याची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते. गणेश मूर्ती स्थापनेपूर्वी कलशाची स्थापना केली जाते. यासाठी नारळ लागतात. शिवाय हरितालिका व गौरी पूजनातही नारळाला विशेष मान असतो. ही बाब लक्षात घेऊनच वर्धा जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचे तब्बल २० लाख नारळ मागविण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांतच पाच लाखांवर नारळांची विक्री झाली. यातून बाजारपेठेत ८० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. गणेश विसर्जन आणि गौरी पूजनाचा शनिवार हा दिवस शिल्लक आहे. या दिवसांतही मोठी उलाढाल होण्याची शक्यता ठोक व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या धुप, दीप, अगरबत्ती आदी साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पाहावयास मिळते. जिल्ह्यात सुमारे १० लाख रुपयांच्या विविध कंपनीच्या अगरबत्ती, धुपबत्तीचा माल मागविण्यात आल्याचे ठोक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अर्ध्याधिक मालाची विक्री झाल्याची माहितीही देण्यात आली. एकूण गणेशोत्सवाची धूम जिल्ह्यात जोरात आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सजावट साहित्य, पूजेचे साहित्य आणि फुलांच्या बाजारामध्ये किमान एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. फुलांचीच बाजारपेठ पाच कोटींच्या घरातगणेश चतुर्थीपासून गुरूवारपर्यंत जिल्ह्यात तब्बल १५० क्विंटल झेंडू, ३५ क्विंटल शेवंती व १० क्विंटल अन्य फुले असा माल आला. या फुलांची किंमत पाहिल्यास ठोकचा विचार केल्यासही तो दोन कोटींच्या घरात जातो. यानंतर महालक्ष्मी पूजनाकरिता जिल्ह्यात फुलांची वेगळी आवक झाली आहे. यात ५०० क्विंटल झेंडू, १५० क्विंटल शेवंती आणि ६० क्विंटल इतर फुले असा माल आला आहे. हा संपूर्ण माल नागपूर येथील बाजारपेठेतून आलेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बाजारात आणलेल्या फुलांचा यात समावेश नाही. जिल्ह्यातील केवळ फुलांच्या बाजारपेठेचा विचार केल्यास गत पाच दिवसांच्या काळात चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फुलांच्या बाजारात सर्वाधिक तेजी, मागणी वाढलीयंदा प्रत्येक प्रकारच्या फुलांचे भाव वधारलेले आहे. वर्धा जिल्ह्यात नागपूर, बंगलोर, मंगलोर येथील बाजारपेठांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फुलांचा माल येतो. यामुळे फुलांच्या माध्यमातून होणारी नेमकी उलाढाल माहिती होत नाही. असे असले तरी नागपूर येथील बाजार भावानुसार फुलांच्या माध्यमातून होणारी उलाढाल सर्वाधिक असल्याचेच दिसते. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू, पांढरी फुले आणि गुलाबाची फुले सर्वाधिक आणली जातात. यात झेंडूची फुले ५० ते ६० रुपये किलो, पांढरी फुले २०० ते ३०० रुपये किलो आणि गुलाब ५०० ते ६०० रुपये किलो प्रमाणे ठोकमध्ये विकले गेले. ही फुले आणि त्यापासून तयार हारांची किंमत जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये अधिक होते. गणेशोत्सव, गौरी पूजन हे महत्त्वाचे सण असल्याने एरवी २० ते ५० रुपयांमध्ये मिळणारे हार १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहे. यातही विविध प्रकारचे गजरे व अन्य सजावटींच्या गुच्छांचे भावही वाढले आहेत.