शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मेहेरच्या परिस्थितीमुळे माणुसकी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:25 IST

येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

देवकांत चिचाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. जवळ असणारा संपूर्ण पैसाही खर्च झाला. दरम्यान भाड्याने राहत्या घरालाही पैशाअभावी मुकावे लागले. यातच आर्थिक स्थिती ढासळली व कुटुंबाचे छत गेले.तीन मुली त्यांचे शिक्षण, पत्नी, यांचे पालनपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा स्थितीत गावातील काही नागरिकांनी मदतीचा हात दिला. टिनपत्रे, बासे तसेच बांधकाम साहित्य वापरून निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. तसेच काहींनी धान्याची व्यवस्था करून दिली. शैलेश वैद्य यांनी मुलींच्या शिकवणीची व्यवस्था केली. लेक वाचवा, लेक जगवा हे अभियान देशात सुरू आहे. या कुटुंबातील मुली हुशार असूनही परिस्थितीपुढे नतमस्तक झाल्या आहेत. गावातील मंडळीप्रमाणे सामाजिक संस्था व इतर नागरिकांनी हातभार लावला तर मेहेरे कुटुंबाचाही विकास होईल व सामाजिक बांधीलकी जोपासली जाईल. या परिवाराला समाजातील दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य