शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

हात उंचावत मेघे समर्थक भाजपात

By admin | Updated: July 5, 2014 23:42 IST

जिल्हा भाजपाच्यावतीने सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात माजी खासदार दत्ता मेघे यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सभामंडपात विदर्भातील

प्रवेश मेळावा : विदर्भातील भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कारवर्धा : जिल्हा भाजपाच्यावतीने सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात माजी खासदार दत्ता मेघे यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी सभामंडपात विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या जागेवर उभे राहुन हात उंचावत मेघे यांच्या आवाहनाला ओ देत काँग्रेस प्रवेश घेतला. यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मेघे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा केली.या मेळाव्याचे औचित्य साधून विदर्भातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दत्ता मेघे यांनी याप्रसंगी सत्कार केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी विराजमान होते. व्यासपीठावर विदर्भातून आलेली मान्यवर मंडळी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सदर मेळाव्यासाठी क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुमारे १५ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी तीन वॉटर प्रूफ डोम उभारण्यात आले होते. हा सभामंडप कार्यकर्त्यांनी खचाखच भरला होता. इतकेच नव्हे, तर अनेकांना उभे राहुन कार्यक्रम बघावा लागला. दुपारपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी सभास्थळी जमू लागली. मैदानाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी सावंगी परिसरातील सर्व रस्ते ओसंडून वाहत असल्यामुळे या ठिकाणी आलेल्या लोकांना मार्ग काढणे कठीण झाले होते. काल-परवापर्यंत प्रवेश मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेले जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यक्रमाची सुत्रे हलविताना दिसले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्याचे संचालन जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे व मिलिंद भेंडे, तर आभार सागर मेघे यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)