शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गवंडी मजदूर युनियनची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:48 IST

स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.उच्च न्यायालय मुंबईच्या ४ आॅगस्ट २०१७ च्या निकालाने मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नतीतील आरक्षण बंद केल्याने कर्मचाºयांना पदोन्नती मिळणार नाही. एवढेच नव्हे तर १९९२ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इंदिरा सहानी वि. भारत सरकारच्या निकालानुसार मागासवर्गीय कर्मचाºयांना १९९७ च्या मुळपदावर पदावनत करण्यात येवून अत्यंत अपमानजनक स्थितीला सामोरे जावे लागेल अशी वेळ येवून ठेपलेली आहे. त्याचप्रमाणे अन्य आरक्षणावर सुद्धा गदा येण्याची भीती यावेळी मार्गदर्शन करताना खैरे यांनी व्यक्त केली.पदोन्नतीतील आरक्षण नाकारणे हे एक षडयंत्र असून ते हाणून पाडण्यासाठी आरक्षण परिषद यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान प्रशांत रामटेके, गौतम पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. संचालन दयानंद हाडके यांनी केले तर आभार दीपक नगराळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन ओरके, राहुल हाडके, नजीर शेख, भानुदास थूल, नाना झिलपे, किशोर देशमुख, यशवंत मानेश्वर, चिंटु दुबे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.