शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दौलतपूर (निंबोली) प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:03 IST

दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देआमदार, जिल्हाधिकारी व नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निम्न वर्धा प्रकल्प उपविभागीय अभियंता रब्बेवार, उपअभियंता शेख, उपजिल्हाधिकारी भू-संपादन चंद्रभान पराते यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत दौलतपूर (निंबोली) येथे पुनर्वसनातील बांधकामाला टँकरने पाणीपुरवठा करणे, बांधकामाच्या रेतीसाठी एक रेती घाट राखीव ठेवणे, त्याच्या रॉयल्टीवर सवलत देणे, घरकुलाची यादी एकाच वेळी मंजूर करणे, शासकीय पट्टे देणे, बेघर लोकांची यादी मंजूर करून त्यांना पट्टे देणे, घरकूल बांधकामासाठी मिळणारा निधी अपुरा असल्याने वाढीव निधीत ४० हजारांची वाढ करून रक्कम देणे, दौलतपूर येथे सातबारा वर्ग १ चा द्यावा, पुनर्वसन अनुदानाची रक्कम मंजूर झाली असून किमान १६ टक्के व अधिकाधिक ४९ टक्के अशी तफावत असल्याने रक्कम अधिक द्यावी, विस्थापित कुटुंबीयांसाठी वाहतूक खर्च, घरकूल बांधकामासाठी प्रत्येक भूखंड धारकाला १ लाख ५० हजार रुपये भूमिसंपादन अधिनियम २०१३ नुसार द्यावे, शेती वहिवाटीकरिता रस्ते करून देण वा वाहितीस कठीण शेती संपादीत करून २०१३ च्या कायद्यानुसार मोबदला द्यावा, राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत घर बांधणीकरिता बँकेकडून कर्ज द्यावे, दवाखाना बांधकामासाठी जागा राखीव असून बांधकाम सुरू करावे. यामुळे लागून असलेल्या वाठोडा (भाईपूर), दौलतपूर (निंबोली), वागदा, पिपरी, अल्लीपूर, धनोडी, माटोडा, बेनोडा या गावांना दिलासा मिळेल. स्मशानभूमी बांधकाम करणे, पुनर्वसनमधील विद्युत पुरवठा डीपी. ओपन स्पेसमध्ये देणे, ट्रस्ट नसलेल्या हनुमान व महादेव मंदिराचे बांधकाम करून द्यावे आदी मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.बैठकीला अनिल काळे, संजय काळे, शैलेश काळे, प्रशांत काळे, किशोर काळे, वसंत मुडे, रामदास बन्नगरे, बाबूलाल कुंभरे, विलास देशमुख, राहुल सुपलकार, सागर भनारकर, सुनील खंडारे, अमित काळे, राजू मोहोकार, अश्विन वºहाडे आदी उपस्थित होते.