शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:37 IST

वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ : रुग्णांसह नातेवाईकांना आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, डॉ. अनुपम हिवलेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून तसेच जिल्ह्याबाहेरून येणाºया रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवाºयाची व्यवस्थेसह भोजन व अल्पोहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर उपहारगृह व निवासीगृहाची संचालन जबाबदारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वर्धा यांना देण्यात आली आहे. सदरशी जुळून असलेल्या महिला बचत गटाच्या महिला रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबियांना मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून सूविधा देणार आहे. कार्यक्रमाला स्वाती वानखेडे, अमोल भागवत, रजनी शिरभैय्ये, विलास झोटींग यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुविधांचा लाभ घ्याजिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अतीशय अल्प दरात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, अल्पोहार व निवाºयाची सूविधा करून देण्यात आली आहे. गरजुंनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याप्रसंगी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीhospitalहॉस्पिटल