शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

हल्ल्याच्या निषेधार्थ मातंग बांधवांचा मोर्चा

By admin | Updated: December 28, 2015 02:36 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी गेलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर येथील पोलिसांनी लाठीहल्ला केला.

पीडितांना शासकीय मदतीची मागणीहिंगणघाट : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी गेलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर येथील पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट येथील मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. तसेच कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्या घेवून १८ डिसेंबर रोजी मातंग समाजाचा मोर्चा निघाला होता. त्या मोर्चावर पोलिसांद्वारे लाठीहल्ला चढविला होता. यामध्ये अनेक जणांना गंभीर दुखापत झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट येथील मातंग समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात काढून निषेध नोंदविण्यात आला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानसभेवर निघालेल्या या मोर्चावर तेथील पोलीस प्रशासनाने कुठलीही सूचना न देता महिला, पुरूष, वृद्धांवर बेधुंद लाठीहल्ला करण्यात आला. यात अनेक महिला, पुरूष गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. या बेधुंद लाठीमाराचा निषेध करीत समाजाला न्याय न दिल्यास आंदोलन केले जाईल असेही निवेदनात सांगण्यात आले. शासनाने अ, ब, क, ड या प्रवर्गाप्रमाणे मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे, गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी, तसेच जखमींना शासकीय मदत मिळाली आदी मागण्याही उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. मोर्चामध्ये माजी नगरसेवक गजानन मुंगले, राष्ट्रीय मातंग महासंघाचे तालुका अध्यक्ष केतन तायवाडे, आशा बावणे, मीरा गायकवाड, इंद्रजीत तायवाडे, प्रकाश निखाडे, संजय पोटफोडे, प्रभाकर खंदार, पुंडलिक तेलंग, दयाराम डोंगरे, बंडू डोंगरे, संदेश चव्हाण, दिलीप डोंगरे, संदेश ससाने, श्यामराव खडसे, अविनाश खंदार, दत्तू निखाडे, पांडूरंग डोंगरे, शीला चव्हाण, गुंफा पोटफोडे, साधना बावणे, कविता तायवाडे, संगीता मुंगले, सुमन बावणे, सुमन तेलंग, सत्यभामा पोटफोडे इतर आदी नागरिक निषेध मोर्चात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)