आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. परंतु नशीबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा अन् निराश्रीत जीवनही येतात. अशा अनाथांचा अंत्यसंक्रार करण्यासाठी मयतीच्या साहित्याचे दान देऊन मसराम दांम्पत्य सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यामुळे हा परिवार अनेक अनाथांसाठी शेवटच्या क्षणी का होईन नाथ होऊन उभा आहेत.जगणं-मरणं एका श्वासाचं अंतर असलं तरी आज पैशा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावतांना दिसतात. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयºयांचाही विसर पडतो. इतकच काय तर जन्मदात्या आई-वडीलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींच्या आयुष्यात अपघाताने एकटेपण येतात. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपत्तीही सारे निरर्थक वाटायला लागतात.पण, वेळ निघून गेल्यानंतर वाट्याला आलेल्या परिस्थितीत कुंठत जगावेच लागते. अशा अनाथ व निराश्रीतांचा अंत्यसंस्काराची जबाबदारीही दुसºयाच्याच खांद्यावर येऊन पडतात. अशावेळी अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही मग तडजोड करण्याची वेळ येते.हीच परिस्थिती लक्षात घेत राणी दुर्गावतीनगर इतवारा चौकातील सतीश सिताराम मसराम हे परिवारासह सामाजिक बांधलकी जोपासताना दिसून येत आहे.कधी साहित्य तर कधी अर्थसाहाय्यमसराम यांचे अंत्यसंस्काराकरिता आवश्यक असलेल्या साहित्य विक्रीचे दुकान आहे. या साहित्यविक्रीतून ते परिवाराचा उदर्निवाह करतात. मयतीचे साहित्य विक्रीचेच दुकान असल्याने येथे शोकाकूल असलेलेच साहित्य खरेदीसाठी येतात. सर्व धर्मांसाठी हा विधी वेगवेगळया पध्दतीने केला जातात. त्यामुळे त्यांच्या दु:खात सहभागी होत त्यांची अडचणीही मसराम दांम्पत्य जाणून घेतात. कधी साहित्य मोफ त देऊन तर कधी आर्थिक मदत करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.मयतीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. मित्राच्या सहकार्याने इतवारा परिसरात हा व्यवसाय सुरु केला असून त्यासाठी बँकेकडून कर्जही घेतले आहे. यावरच कुटूंबाचा उदर्निवाह सुरु आहे. आयुष्यात पैसाच सारं काही नाही, दु:खीतांच्या चेहºयावर हसू फुलविण्यासारखं दुसरं पुण्य नाही. यामुळे आम्ही अंत्यसंस्काराच्या साहित्य विक्रीतून काहींना सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. तसेच निराश्रीत व अनाथांच्या अंत्यविधीकरिता सहित्य मोफत देऊन माणुसकीच कर्तव्य निभावत आहे.सतीश सीताराम मसराम, राणी दुर्गावती नगर, इतवारा चौक़
अनाथांकरिता मसराम दाम्पत्य बनलेय नाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:31 IST
‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते.
अनाथांकरिता मसराम दाम्पत्य बनलेय नाथ
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : अंत्यविधीसाठी करतात मयतीच्या सामग्रीचे दान