शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरच्या नावाखाली गंडा घालणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:10 IST

शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह इतर साहित्य जप्त केले आहे.

ठळक मुद्देहरियाणातून तिघांना अटक : अनेकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतात मोबाईल टॉवर लावून देण्याचे आमीष देऊन सुमारे १०० हून अधिक लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली आहे. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह इतर साहित्य जप्त केले आहे. ललित रामकुमार रोहिला (२४), गुरनाम सिंह रमेश कुमार सिंह व रवी धरमसिंग आतरी सर्व राहणार हरियाणा अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सूत्रानुसार, कैलास मारोती पिसे (२७) रा. डोगरगांव, ता. समुद्रपूर यांनी पोलिसांकडे आपली काही जणांनी टॉवर लावण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार सादर केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. त्यानंतर खात्रिदायक माहितीच्या आधार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरियाणा गाठून सदर तिनही आरोपींना ताब्यात घेतले.सदर आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांच्या चमुने हरियाणा राज्यातील करनाल येथून काही बँकांमधील सीसीटीव्ही चित्रिकरण प्राप्त केले. शिवाय परिसरातील कॉल सेंटरची माहितीही गोळा केली. पोलिसांच्या सदर चमुने हरियाणा राज्यात काही दिवस राहून आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर ललीत रामकूमार रोहीला, गुरनाम सिंह रमेशकुमार सिंह व रवी धरमसिंग आतरी याला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे गुरनाम हा नागरिकांची फसणूककेल्यानंतर ए.टी.एम. मधून रक्कम काढण्याचे काम करीत होता. सदर तिनही आरोपींपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच मोबाईल, तीन डायरी व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, ना.पो.शि. दिनेश बोथकर, अनूप कावळे, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, चंद्रकांत जीवतोडे आदींनी केली.

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी