शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

बाजारात रूईचे दर वाढताहेत; कापसाचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:20 IST

सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे.

ठळक मुद्देबाजारातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ नाहीबोंडअळीचा प्रभाव कायम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. यामुळेच कापसाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, कापूस दरवाढीची शेतकऱ्यांची आशा मावळल्याचे चित्र आहे.अमेरिकेच्या कापूस बाजारात २०१७ साली १ किलो रूईचा भाव १ डॉलर ७९ सेंटच्या आसपास होता. यावेळी देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला ५,००० ते ५,५०० रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला होता. आज अमेरिकेत रूईचा भाव १ डॉलर ९५ सेंट आहे. म्हणजेच रूईबाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे भाव ४,७०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचेच आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तान मधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. यातच बोंडअळीच्या हल्ल्याने कापसाचा दर्जा खालावला असून त्याची मागणी नाही. व्यापाऱ्यांकडून कापसाला दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.सध्या कापसाना हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने कापूस आयातीकडे कुणाचेही लक्ष नाही. २०१५-१६ साली २२ लाख गाठी, २०१६-१७ साली ३० लाख गाठी आयात झाल्या होत्या. २०१७-१८ साली १७ लाख गाठी आयात होणार आहे. कापसावर आयातकर शून्य असल्यामुळे हा प्रकार घडत आहे.

सरकीच्या दरामुळे आशा मावळली२०१७ मध्ये सरकीच्या भावात विक्रमी तेजी होती. सरकारचे भाव २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढले होते. खाद्य तेलाच्या भावात मंदी होती तरी सरकीचे भाव तेजीत होते. त्यावेळी २,३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलचे भाव सरकी ढेपीचे होते.देशातील रूई बाजारात ३,९०० रुपये ते ४००० रुपये प्रती खंडी रूईचे भाव होते. यावेळी सरकीचे दर २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटल होते. म्हणूनच कापसाचे भाव ५५०० च्या आसपास होते. आज रूईचे भाव ४,००० रुपये ते ४,२०० रूपये खंडीचे आहेत; पण सरकीचा भाव १,६०० ते १,७०० रूपये प्रती क्विंटलचाच आहे. यामुळे कापसाला दर कमी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

म्हणूनच दर ४,८०० ते ५,००० रुपयांवर१ क्विंटल कापसापासून ३४ किलो रूई व ६५ किलो सरकी मिळते. १ खंडी रूई म्हणजे १.७० किलो रूईच्या दोन गाठी. म्हणजेच १० क्विंटल कापसापासून १ खंडी रूई व ६.५ क्विंटल सरकी मिळते. म्हणूनच आज कापसाला ४,८०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचे भाव मिळत आहे.

कापसाच्या दराबाबत अनेकांकडून विचारणा होत आहे. प्रारंभी सरकीला दर होता म्हणून कापसाला ५ हजारांच्या वर दर मिळाले. आता पुन्हा सरकीचे दर पडले असल्यामुळे कापसाचे दर कोसळले. यातच यंदाच्या कापसावर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे व्यापाऱ्यांकडून कापसाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना दर दिला जात नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते,

टॅग्स :cottonकापूस