शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मृतदेहाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:58 IST

स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअत्याचार करुन हत्या केल्याचा संशय : कानकाटी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्या विवाहितेचा महामार्ग क्रमांक ७ वरील कानकाटी शिवारात वना नदीच्या पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.संज्योती पुनेश्वर तामगाडगे (३२) रा. कानकाटी असे मृतक महिलेचे नाव आहे. तिचा पती मागील चार ते पाच वर्षापासून पवनी (मांढळी) येथे राहत असून ती दोन मुलांसह कानकाटी येथील भाऊ निकेश डंभारेकडे राहत होती. मृतक संज्योती पती व मुलांसह ५ डिसेंबरला मुंबईला गेले होते. तेथून ते ९ डिसेंबरला परत आले. हिंगणघाटला पोहोचताच पती पुनेश्वर पवनीला निघून गेला तर हे तिघेही मायलेक कानकाटीला आले. मृतकच्या वहिणीला मुलगी झाल्याने ती हिंगणघाटच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचा डबा घेऊन ती रविवारी दुपारी १.३० वाजता रुग्णालयात पोहोचली. तेथून सायंकाळी ५.३० वाजता कानकाटीला जाण्यासाठी निघाली. पण, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलीच नाही. त्यामुळे भावाने व मुलांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र, संपर्क झाला नाही. शेवटी सोमवारी सकाळी ८ वाजतादरम्यान कानकाटीच्या नदी पुलाखाली महिलेचा मृतदेह असल्याची वार्ता गावात पसरली. त्यामुळे तिच्या मुलाने लगेच घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता त्याला आईचाच मृतदेह आढळून आला. संशयास्पद असलेल्या या मृतदेहावरुन अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. माहिती मिळताच समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरिक्षक मिलींद पाराडकर, अमोल खाडे, अरविंद येणुरकर, आशिष गेडाम, धनंजय पांडे, विरु कांबळे, रंजना झिलपे, धारणे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. यावेळी प्रयोगशाळा तज्ज्ञ एस.सी.साठवणे, मंगेश धांमद, आशिष उमेकर व श्वानपथक दाखल झाले होते. पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरिक्षक मिलींद पाराडकर करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूMurderखून